कुरखेडा : विटा भट्टीने आरोग्य धोक्यात, निर्बंध घालण्याची कुंभिटोला वासियांची मागणी

363

– तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, १७ जानेवारी : तालुक्यातील कुंभिटोला गावाच्या ५०० मीटर परिसरात विटा भट्टी असल्याने गावातील नागिरकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यावर निर्बंध घालण्यात यावे अशी मागणी कुंभिटोला वासियांची तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना १६ जानेवारी रोजी निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, कुंभिटोला हे गाव महसूल दप्तरी पूरग्रस्त नोंद असून दरवर्षी पुराचा फटका या गावाला बरसत असतो. गावाच्या नजीक असलेल्या सती नदीपासून अगदी जवळच मोठ्‌या प्रमाणात विटाभट्टीसाठी अवैध माती उत्खनन केले जाते. सदर उत्खनन केल्यामुळे नदीचा प्रवाह बदलून गावाकडे वाढण्याची दाट शक्यता असून गावाच्या अस्तित्वास धोका निर्माण होवून भविष्यात मोठे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते तसेच गावाच्या ५०० मीटर परिसरात विटा भट्टी लावल्याने विटा भट्टी मधील राखड़ हवेने गावात उडून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन नदी किनारी व गावालगत असलेल्या भट्टी धारकांना विटा टाकण्यात करिता परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतांना चेतन गहाणे, नामदेव परशुरामकर, धनंजय तलांडे,  विशाल पोरेटी, आदी नागरिक उपस्थित होते.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (JEE Main 2023 Admit Card) (PSG) (Australian Open) (The Last of Us TV series) (OpenAI) (Kurkheda: Brick kiln health hazard, Kumbhitola residents demand restriction)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here