– संपूर्ण टीमचे होत आहे अभिनंदन
The गडविश्व
ता.प्र / सावली, २५ जुलै : तालुक्यातील लोंढोली येथील आरोग्य वर्धिनी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यमजलवार तथा आरोग्य सेवक मडावी, श्रीमती कुळमेथे, आरोग्य सेविका आत्राम, आशा वर्कर यांनी गरोदर महिलेला पुर परिस्थितीत ग्रामीण रुग्णालय सावली येथे हलविले. त्यांच्या या कार्याने संपूर्ण टीमचे होत आहे अभिनंदन होत आहे.
मागील आठवड्याभरात जिल्ह्यात व सावली तालुक्यात अती मुसळधार पाऊस चालू होता. सगळीकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि अनेक गावाचा पुरामुळे संपर्क तुटला होता. हीच परिस्थिती बघता जिल्हाधिकारी यांनी शाळा महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
हरंबा (उपरी) येथील महिला शिल्पा पिंटू गेडाम (२२) यांची प्रसुतीची वेळ जवळ आल्याने त्यांना लोंढोली आरोग्यवर्धीनी येथे भरती करण्यात आले होते पण प्रकृती थोडी हलाखली असल्यामुळे व सर्व मार्ग बंद असल्याने तिला बाळंतपणासाठी सुरक्षित स्थळी पोहचवण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. यमजलवार व सर्व टीम नी जबाबदारी घेत भर पावसात २१ जुलै ला ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती करण्यात आले. यांच्या या कार्यामुळे व चांगली सेवा पुरवीत असल्याबाबत परिसरात सर्व टीमची स्तुती करण्यात येत आहे.
![](https://www.thegdv.com/wp-content/uploads/ADD111-scaled.jpg)
रुग्णालयाचा प्रभार एकाच डॉक्टरवर
लोंढोली येथील आरोग्य वर्धिन केंद्रात गरोदर मातांचे टेस्ट, ऑपरेशन व ईतर चाचणी होत असल्याने व घोडेवाही ते डोनाळा पर्यंत सर्व पेशंट येत असल्याने सर्व प्रभार एकाच डॉक्टर वर येत आहे. तरी आपल्या कर्तव्यात कसूर न ठेवता प्रामाणिकपणे काम करीत असतात.
निवेदन देऊनही महिला डॉक्टर मिळाली नाही
लोंढोली येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात यापूर्वी दोन डॉक्टर काम करीत होते. एका वैद्यकीय अधिकारी यांचेवर कामाचा ताण आणि गरोदर महिलांसाठी एक BAMS महिला डॉक्टरसाठी जिल्हा अधिकारी यांना मेल द्वारे आणि व्हॉट्सअप द्वारे निवेदन देण्यात आले होते पण काहीही उत्तर मिळाले नाही.
– देवाजी बावणे सामाजिक कार्यकर्ता साखरी