– अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली तालुका तर्फे तहसीलदारमार्फतीने निवेदन सादर
The गडविश्व
ता.प्र /सावली, २५ जुलै : भारत देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होत आहेत. मणिपूर राज्यात जातीय हिंसाचारात अनेक निश्पाप नागरिकांचे बळी गेलेले आहेत. अनेक महिलांचे शोषण करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच मणिपूर राज्यातील दोन महिलांना निवस्त्र करून ठार मारण्यात आलेले आहे. हि घटना मानव जातीला काळीमा फासणारी असून मणिपूर मधील महिलांवरील अत्याचारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या देशात महिला सुरक्षित नाहीत हे यावरुन दिसून येत आहे.
मणिपूर राज्यात सध्या जो हिंसाचार सुरु आहे. त्याकडे केंद्र सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे. गेल्या तिन महिन्यापासून मणिपूर अशांत आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष्य देवून परिस्थिती हाताळण्याची आवश्यकता होती मात्र शासन यात पुर्णपणे अपयशी ठरलेली आहे. आणि त्यामुळे सदर गंभीर बाबीकडे आपण जातीने लक्ष्य देण्याची आवश्यकता आहे.
मणिपूर राज्याचे मुख्य मंत्री यांना तात्काळ हटविण्यात यावे आणि दोषी ला फाशीची सजा देण्यात यावी याकरिता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा सावलीच्या वतीने सावली तहसीलदार पाटील मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चंद्रपूर जिल्हा युवक अध्यक्ष अतुल कोडापे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली तालुका अध्यक्ष प्रवीण गेडाम, रमेश कनाके, मयूर गेडाम, युवराज उईके आदी अनेक पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते.
