एकही दिवस शाळेत न जाता समाजातील अंधश्रद्धे विरोधात रान इठवणारे आणि स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे महान संत गाडगेबाबा

123

The गडविश्व
ता.प्र. / आरमोरी(नरेश ढोरे), २३ फेब्रुवारी : एकदा पैंठणला एका ठीकाणी” दशक्रिया “विधी चालु असतो.
लोक अजुबाजुला बसलेली असतात.
घरचे लोक रडतच मेलेल्या माणसाबद्दल चांगल बोलत असतात. शेजारीच न्हावी वारसाची डोकी भाद्रत असतो. एका पत्रावली वर चार पाच भाताचे गोळे ठेवलेले असतात आणि तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला एकदम मळकट असा दाढी वाढलेला वयस्कर माणुस तिथ येतो आणि भटजी कडे विनवणी करतो की मला खुप भुक लागली आहे. दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही माझ्यावर दया करा आणी समोर ठेवलेल्या भाताच्या गोळ्यातील एक गोळा मला द्या. हे ऐकुन भटजी संतापतो. भटजीच बोलण ऐकुन लोक ही त्या म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर जातात पण अगदी मळकट लेला आणी भिकारी दिसतोय म्हणुन त्याला हाकलून देतात. तरी पण तो माणुस परत विनवणी करतो. आहो दोन दिवस उपाशी आहे धर्म करा आणी एक गोळा द्या या गरिबाला. त्यावर भटजी म्हणतो यातील एक ही गोळा तुला देता येणार नाही. कारण हा भात म्हणजे जो दहा दिवसापुर्वी मेला आहे त्या साठी त्याला द्यायचा आहे. म्हातारा तरी ऐकेना म्हातारा म्हणतो तो माणुस आता कुठे आहे. त्यावर भटजी म्हणतो स्वर्गात. लोक ही तेच बोलतात. मग म्हातारा म्हणतो स्वर्ग कुठ आहे. भटजी म्हणतो खुप लांब आहे आणी हे बोलुन सगळे जण त्या म्हाताऱ्याला हाकलून देतात. (दशक्रिया विधी नेहमी ओढ्याच्या किंवा नदीच्या काठावर करतात )मग तो म्हातारा शेजारी असलेल्या नदीच्या पाण्यात उतरतो आणी नदीतील पाणी बाहेरच्या जमीनीवर हाताने फेकतो. सुरुवातीला कुणी लक्ष देत नाही पण बराच वेळ झाल्यावर भटजी सह सगळे जण विचारतात ये म्हाताऱ्या अरे काय काय वेड लागलय का काय तुला ? हे काय करतोय?
त्यावर तो म्हातारा दाढी खाजवत म्हणतो “बाप्पा हो यंदा दुष्काळ पडलाय आणि शेताला पाणी नाही म्हणून पाणी देतोय… लोक म्हणतात कुठ आहे शेती तुझी म्हातारा म्हणतो अमरावतीला
लोक म्हणतात कुठ आहे अमरावती? म्हातारा म्हणतो खुप लांब आहे अमरावती लोक आणी भटजी सगळे त्याला हसुन म्हणतात “आरे वेड्या इथुन टाकलेले पाणी तर इथेच तर पडतय आणी कस तुझ्या शेताला पाणी मिळेल. यावर म्हातारा म्हणतो इथ ठेवलेला भात जर मेलेल्या माणसापर्यंत हा भटजी पोचवत असेल तर मी टाकलेल पाणी माझ्या शेताला का मिळणार नाही? हे ऐकल्यावर सगळे लोक चक्रावून जातात. हा भिकारी नसुन कुणीतरी अवलिया आहे हे मान्य
करुन त्या म्हाताऱ्याच्या पायावर डोकं ठेवतात.
हा म्हातारा दुसरा तिसरा कुणी नसुन अमरावती जिल्ह्य़ातील डेबुजी झिगंराजी जानोरकर एकही दिवस शाळेत न गेलेला महान विज्ञान वादी संत गाडगेबाबा हे होते वैज्ञानिक विचार करायला शिक्षण लागतेच अस नाही तर आपल्या डोक्यातील मेंदु गहाण न ठेवता स्वतंत्र असावा लागतो.

‘अंधश्रध्दा संपली पाहिजे…!
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here