– इतर सदस्यांचा अविश्वास ठराव दाखल झाल्याने पायउतार
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी (नरेश ढोरे), २३ फेब्रुवारी : तालुक्यातील ठाणेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा स्नेहा भांडेकर यांच्यावर इतर सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करून आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डाहट यांच्या समक्ष बैठक घेऊन ठरावावर स्वाक्षरी घेऊन उपसरपंचा स्नेहा भांडेकर यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
तालुक्यातील ठाणेगाव ग्रामपंचायतमध्ये उपसरपंचा पदावर असलेल्या स्नेहा भांडेकर ह्या इतर सदस्य व सरपंचाला विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे, प्रशासकीय कामात ढवळाढवळ करणे, गावातील नागरिकांना ग्रामपंचायत मधील सदस्यांच्या विरोधात व सरपंचाच्या विरोधात भडकवणे, सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करणे, मासिक सभेत सरपंच ग्रामसेवक व इतर सदस्यांना अश्लील शब्दात बोलणे, गावातील विकास कामांना मंजुरी देताना हो म्हणणे व काम पूर्णत्वास आल्यास त्याबद्दल खोड्या काढणे आशा विविध विविध प्रकारच्या आरोपाखाली ग्रामपंचायत कार्यालयातील ९ सदस्य पैकी ८ सदस्यांनी सरपंचासह १४ फेब्रुवारी २०२३ रोजी ठराव घेऊन तहसील कार्यालय आरमोरी येथे २० फेब्रुवारी २०२३ रोजी तहसीलदार कल्याणकुमार डाहट यांच्या समक्ष बैठक घेऊन ठरावावर स्वाक्षरी करण्यात आली यात स्नेहा गोपाल भांडेकर यांनी विविध प्रश्न उपस्थित करून ग्रामपंचायत मधील विकास कामांना अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सर्व सदस्यांनी केले. हा ठराव सर्व सदस्यांनी बहुमत मिळून पारित करण्यात आलेला असून उपसरपंचा स्नेहा गोपाल भांडेकर यांना उपसरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. यात ग्रामपंचायत मधील सर्व सदस्यांनी प्रयत्नाला यश आल्याचे व्यक्त केले आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The GDV)