– वाघाचे मृत्यूसत्र सुरूच, मृत्यूचेकारण अस्पष्ट
The गडविश्व
ता.प्र / सावली, दि.२५ : वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवन क्षेत्रातील कापसी बीट परिसरात आज २५ डिसेंबर रोजी पहाटे च्या सुमारास गोसेखुर्द नहराच्या शेजारच्या शेतात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकचं खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती वनविभागास देण्यात आली असता वनपाल कोडापे सह वनविभागाची चमू तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. वाघाचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप कळू शकले नाही. वाघाच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण कळू शकणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मृत्यूचे सत्र सुरू असून गत दीड महिन्यात सात वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. वाघांच्या मृत्यूने वनविभागात खळबळ उडाली असून एकीकडे शासन वाघ वाचविण्याकरिता शर्तीचे प्रयत्न करीत आहे मात्र शिकारी व अन्य कारणाने वाघांच्या मृत्यूच्या घटनेत दिवसेंदिवस पुढे येत असल्याने त्यामुळे वनविभाच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतांना दिसते.
(the gdv, the gadvishva, gadchiroli , chandrapur, saoli, forest, tiger deth )