ब्रह्मपुरी – नागभीड मार्गावर भीषण अपघात : दोघेजण ठार

2218

– तिघेजण जखमी
The गडविश्व
ता.प्र / ब्रह्मपुरी, दि. १० : नागभीडमार्गे ब्रह्मपुरी कडे येत असतांना खरबी फाटा नजीक कार व ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघेजण ठार तर तिघेजण जमखी झाले. हा अपघात १० जुलै रोजी पहाटे ०५ वाजताच्या सुमारास घडला. दिलीप परसवानी (वय ५५), मेहेक जितेंद्र परसवानी (वय ४२) असे अपघातातील मृतकाचे नाव आहे तर जितेंद्र परसवानी (वय ४५), गौरव जितेंद्र परसवानी (वय १७), उदय जितेंद्र परसवानी (वय १०) सर्व रा. वडसा असे जखमींची नावे आहेत.
परसवानी कुटुंबातील पाच जण हे नगभिड मार्गे एमएच ३३ व्ही ९१३८ क्रमांकाच्या टाटा टियागो वाहनाने पहाटेच्या सुमारास वडसाकडे येत होते. दरम्यान नागभीड – ब्रह्मपुरी मार्गावरील खरबी फाटा नजीक पहाटे ५ वाजताच्या सुमारास एमएच ४० सिटी ०५७४ क्रमांकाच्या आयशर ट्रकशी कार ची जबर धडक होऊन भीषण अपघात झाला . या अपघातात कार मधील दोघे जण ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. अपघात एवढा भीषण होता की चारचाकी वाहनाचा पुढील भाग हा पूर्णतः क्षतिग्रस्त झाला असून कार रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली आहे तर आयशर ट्रक सुद्धा मुख्य मार्गावरच पलटी झालेला आहे.
घटनेची माहिती होताच ब्रह्मपुरी पोलीस घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे. सदर घटनेने वडसा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

( #thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpuenews #bramhpuriaccident #caraccident )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here