गडचिरोली : दोन जहाल नक्षल्यास अटक

2939

गडचिरोली : दोन जहाल नक्षल्यास अटक
– दहा लाखांचे बक्षीस होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : जिल्ह्यातील पेनगुंडा येथील दिनेश गावडे या निरपराध इसमाची नोव्हेंबर २०२३ मध्ये हत्या केल्याच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या दोन जहाल नक्षल्यास गडचिरोली पोलिसांनी मंगळवार ९ जुलै २०२४ रोजी अटक केली आहे. रवि मुरा पल्लो ( ॲक्शन टिम कमांडर), वय ३३ , दोबा कोरके वड्डे (पार्टी सदस्य, भामरागड दलम), वय ३१ वर्ष दोघेही राहणार कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षल्यांची नावे आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकुण १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना त्यांना रवी पल्लो व दोबा वड्डे हे दोघे पोस्टे धोडराज हद्दीत घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असतांना आढळुन आल्याने विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची अधिक सखोल चौकशी केली असता या दोघांचा नोव्हेंबर २०२३ मध्ये पेनगुंडा येथे झालेल्या दिनेश गावडे या निरपराध इसमाच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पोस्टे धोडराज येथे कलम 302,143,147,148,149,120 (ब) भादवि सह कलम 3/25 भाहका अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आली.

रवि मुरा पल्लो हा 2016 पासून जनमिलिशीया पदावर भरती होऊन नक्षल्यांची कामे करित होता. 2018 पासून ॲक्शन टिम सदस्य म्हणून काम करीत होता. 2022 मध्ये ॲक्शन टिम कमांडर म्हणून बढती व आजपावेतो कार्यरत होता.
त्याचेवर आजपर्यंत एकुण 06 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 01 चकमक, 01 जाळपोळ, 03 खून व 01 ब्लास्टींग या गुन्ह्रांचा समावेश आहे.
2019 मध्ये मोरोमेट्टा जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. या चकमकीत 02 नक्षल्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते. 2022 मध्ये धोडराज ते इरपनार मार्गावरील पेनगुंडाजवळ रस्ता बांधकाम बंद करण्याच्या हेतूने कामावरील ट्रॅक्टर, ग्रेडर व जेसीबी सारख्या 19 वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
नोव्हेंबर 2018 मध्ये इरपनार येथील निरपराध महिला बेबी मडावी हिच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग. 2022 मध्ये नेलगुंडा येथील निरपराध इसम राजेश आत्राम याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग व नोव्हेंबर 2023 मध्ये पेनगुंडा येथे झालेल्या निरपराध इसम दिनेश गावडे याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच २२ मार्च २०२३ रोजी नेलगुंडा जंगल परिसरात जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
महाराष्ट्र शासनाने रवि मुरा पल्लो याच्या अटकेवर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

 

दोबा कोरके वड्डे हा 2008 पासून जनमिलिशिया पदावर भरती होऊन नक्षल्यांचे काम केले. 2019 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो कार्यरत
त्याचेवर आजपर्यंत एकुण 18 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 05 चकमक, 07 खून व इतर 06 गुन्ह्रांचा समावेश आहे.
त्यामध्ये 2019 मधील मोरोमेट्टा जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. या चकमकीत 02 नक्षल्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते.
2022 मध्ये धोडराज ते इरपनार मार्गावरील पेनगुंडाजवळ रस्ता बांधकाम बंद करण्याच्या हेतूने कामावरील ट्रॅक्टर, ग्रेडर व जेसीबी सारख्या 19 वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
2022 मध्ये नेलगुंडा येथील निरपराध इसम राजेश आत्राम याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग. नोव्हेंबर 2023 मध्ये पेनगुंडा येथे झालेल्या निरपराध इसम दिनेश गावडे याचे हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
महाराष्ट्र शासनाने दोबा कोरके वड्डे याच्या अटकेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 81 नक्षल्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश सा. तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिताच्या जवानांनी पार पाडली. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षल्यांना नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #twonaxalarrest #spnilotpal )

————————————————————————————–

Gadchiroli Police arrested two hardcore Maoists who were actively involved in the murder of an innocent person in Pengunda
– Government of Maharashtra had announced a total reward of Rs 10 Lakhs for their arrest.

Gadchiroli district being affected by Maoist activities, they engage in anti-national activities such as damaging government property, attacking security personnel, and obstructing government work by arsons etc. Two such hardcore Maoists who were actively involved in several violent activities against the security forces were arrested by the Gadchiroli Police today i.e on 09/07/2024, just few days before the upcoming Naxal Week of the Maoists. Due to the effective operations of the Gadchiroli Police, a total of 81 Maoists have been arrested since Jan. 2022.
Detailed report is that, in the forest area within the jurisdiction of PS Dhodraj under the limits of Bhamragad sub-division. C-60 Pranhita squad while conducting an Anti-Maoist operation, found two persons suspiciously roaming in the said forest and took them into custody. Upon further investigation, the suspects were identified as
1) Ravi Mura Pallo (Action Team Commander) Age 33 yrs. R/o, Kawande, Tah- Bhamragad, Distt. Gadchiroli and 2) Doba Korake Wadde (Party Member, Bhamragad LOS), age 31 yrs. R/o Kawande, Tah-Bhamragad, Distt. Gadchiroli.
It was found that both of them were directly involved in the murder of Dinesh Gawde, an innocent person, which took place in Pengunda village in November 2023. They were arrested in Cr. No. 02/2023 U/s 302, 143, 147, 148, 149, and 120(b) of the IPC, including section 3/25 of the Arms Act.

Information about the Arrested Maoist:

1. Ravi Mura Pallo

Tenure in Maoist Organization:

In 2016, he was recruited as Janmilitia.
Since 2018, he was working as Action Team Member.
In 2022, promoted as Action Team Commander and worked on this post till date.

Offences registered: –

A total of 06 crimes have been registered against him, including 01 Encounter, 01 Arson, 03 Murders and 01 other.

Offences committed during his tenure:

In 2019, he was involved in an exchange of fire with Police in the Morometta forest area. In this encounter, two Maoist were neutralised in a fierce gun battle between Police and Maoists.
In 2022, he was directly involved in setting afire 19 vehicles, including tractors, graders, and JCBs, on the road near Pengunda along Dhodraj to Irpanar route to obstruct road construction.
He was directly involved in the killing of an innocent woman named Bebi Madavi in Irpanar in November 2018.
He was directly involved in the killing of an innocent person named Rajesh Atram in Nelgunda in 2022.
He was directly involved in the killing of an innocent person named Dinesh Gawade in Pengunda in Nov. 2023.
On 22/03/2023, he was directly involved in planting IED’s in Nelgunda forest area.

2. Doba Korake Wadde

Tenure in Maoist Organization:

In 2008, he was recruited as Janmilitia.
In 2019, he was recruited as Party Member in Bhamragad LOS and worked until now.

Offences registered: –

A total of 18 crimes have been registered against him, including 05 Encounters, 07 Murders and 06 others.

Offences committed during his tenure:

In 2019, he was involved in an exchange of fire with Police in the Morometta forest area. In this encounter, two Maoist were neutralised in a fierce gun battle between Police and Maoists.
In 2022, he was directly involved in setting fire to 19 vehicles, including tractors, graders, and JCBs, on the road near Pengunda along Dhodraj to Irpanar route to obstruct road construction.
He was directly involved in the killing of an innocent person named Rajesh Atram in Nelgunda in 2022.
He was directly involved in the killing of an innocent person named Dinesh Gawade in Pengunda in Nov. 2023.

Rewards on their arrest:

Maharashtra Government had announced a reward of Rs. 08 lakhs for Ravi Mura Pallo’s arrest and Rs. 02 lakhs for Doba Korake Wadde’s arrest.

Due to the intensified operations conducted by the Gadchiroli Police, a total of 81 hardcore Maoists have been arrested since January 2022. This action was undertaken under the guidance of Neelotpal, Superintendent of Police, Gadchiroli, Yatish Deshmukh, Addl. Supdt. Of Police (Ops.), Kumar Chintha, Addl. Supdt. Of Police (Admin.), M. Ramesh, Addl. Supdt. Of Police, Aheri and Vishal Nagargoje, Dy. SP (Ops.) by C-60 Pranhita personnel. Furthermore, Neelotpal, SP Gadchiroli, has appealed to active Maoist cadres to renounce the path of violence and surrender in order to live their lives with dignity.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here