The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १३ ऑक्टोबर : तालुक्यातील मुरुमगाव येथील स्व. रामचंद्रजी दखणे विद्यालयात व्यसनमुक्ती वर आधारित बोलपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.
या बोलपटात खर्रा, तंबाखू सेवन गुटखा यांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम प्रामुख्याने दाखवण्यात आले. व्यसनी व्यक्तीचे शरीर व्यसनामुळे कशी खिडखीडी होते व शेवटी कॅन्सर सारख्या महाभयंकर रोगाच्या जाड्यात निरोगी शरीर कसे कमकुवत होतजाते हे ,”यमाचा फास “या बोल पटातून विद्यार्थ्यांना दाखवून त्यांना व्यसनमुक्त शाळा निर्माण करून समाजामध्ये खर्रा खाऊ नका,देऊ नका, खाऊ देऊ नका, असा संदेश पोहोचवण्यासाठी प्रेरित केले.
यावेळी मुक्तिपथ कार्यालय धानोरा येथील भास्कर कड्याम, स्पार्क कार्यकर्ता जीवन दहीकर, शाळेतील शिक्षक एम.डी .जांभुळकर, बि .जे. मेश्राम, जी. जे .चिंचोलकर ,बी. जे. बोरकर, सुरेश तुलावी, रमेश निसार आदी उपस्थित होते.