गडचिरोली : अतिक्रमण गिळतोय रस्ता, नगर प्रशासन सुस्त

658

– अतिक्रमण हटाव मोहीम नावापुरतीच ?
The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑक्टोबर : स्थानिक नगर परिषदेच्या वतीने काही दिवसांपूर्वी मुख्य मार्गालगत असलेले अतिक्रमण हटविण्यात आले होते मात्र काही दिवसांनी पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याने अतिक्रमनाने रस्ता गिळला जात आहे.
जिल्हा दौऱ्यावर देशाच्या राष्ट्रपती मुर्मु आल्या होत्या. त्यावेळी शहरातील अनेक ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले होते. इंदिरा गांधी चौकातील अतिक्रमनावर बुलडोजर चालविण्यात आला होता. तसेच त्या दरम्यान इंदिरा गांधी चौकातील रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी जाळी लावण्यात आली होती मात्र असे असतांनाही ती जाळी तोडून पुन्हा अतिक्रमण केल्याने व पुन्हा अतिक्रमण झाल्याने रस्ता कमी पडत आहे. नुकतेच इंदिरा गांधी चौकात वाहतूक दिवे सुरू करण्यात आले आहे यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा असतात मात्र चौकातील रस्त्याच्या कडेला असेलेल्या अतिक्रमनाने व पार्किंग अभावी रस्त्यावर वाहने ठेवत असल्याने मात्र वाहतुकीसाठी रस्ता लहान होत आहे यामुळे अपघाताची शक्यता आहे. पुन्हा अतिक्रमण झाले परंतु नगर प्रशासन मात्र सुस्त दिसत आहे मग ती अतिक्रमण हटाव मोहीम ही नावापुरतीच होती काय ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

जाळी तोडून अतिक्रमण

इंदिरा गांधी चौकातील रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण हटविल्यानंतर जाळी लावण्यात आली होती मात्र आता ती जाळी तोडून पुन्हा अतिक्रमण करण्यात आले आहे. याकडे मात्र नगर परीषदेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी भिरकूनही पाहिले नसतील का ? जाळी तोडण्यास मुकसंमती तर नाही ना ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व बाबीकडे नगर प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, atikraman, nagar parishad, dropadi murmu)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here