– परीक्षा शुल्कही या तारखेपर्यंत भरता येणार
The गडविश्व
गडचिरोली, १७ जुलै : तलाठी पदभरती २०२३ करिता ऑनलाईन अर्ज २६ जुलै पासून मागविण्यात आले होते. दरम्यान १७ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार होते मात्र आता त्यास मुदतवाढ करण्यात आली आहे. आता सदर ऑनलाईन अर्ज १८ जुलै च्या रात्रो ११.५५ वाजता पर्यंत करता येणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क २० जुलै रात्रो ११.५५ वाजतापर्यंत भरता येणार आहे. तर ही मुदतवाढ अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदस्तवाढ देण्यात येणार नाही आहे.
