कुरखेडा : क्युआर कोडच्या माध्यमातून व्यापारास २५ हजारांनी गंडवीले

938

– क्युआर कोडच्या सहाय्याने पेमेंट करण्यापूर्वी सावधानता बाळगा
The  गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १८ जुलै : एका अज्ञाताने फोन करून बांधकाम साहित्य आर्डर करून स्थळावर स्थळावर पोहचल्यावर पेंमेंट केल्या जाईल असे म्हणत ऑनलाईन पेमेंट करण्याकरिता पाठविलेल्या क्युआर कोडच्या माध्यमातून त्या व्यापारास हजारो रूपयांनी गडवील्याची घटना कुरखेडा तालुक्यात १५ जुलै रोजी घडली. सदर घटनेने तालुक्यासह जिल्हाभरात खळबळ उडाली असून ऑनलाईन पेमेंट करण्याकरीता क्युआर कोडच्या माध्यमातून फरवणूक होत असल्याचा प्रकार उघकीस आला आहे.
कुरखेडा येथील एका बांधकाम साहित्य विक्रेत्याला एका अज्ञात क्रमांकावरून फोन येतो, त्यात तो म्हणतो की, आमच्या कडे बांधकाम सुरू असल्याने आपल्याकडील १०० बॅग सिमेंट पाहिजे आहे. आम्हाला आमच्या बांधकामस्थळी सदर साहित्य पोहचता करून दया, पेमेंट बांधकामस्थळी कॅश स्वरूपात दिल्या जाईल. व्यापारी हा १०० बॅग सिमेंट बांधकामस्थळी पोहचता करतो. आमच्या वरिष्ठांचा आपल्याला फोन येईल त्यांच्यासह बोलुन घ्या असे अज्ञात त्या व्यापार्‍यास म्हणतो आणि वरिष्ठाचा फोन आल्यानंतर तो व्यापार्‍यास कॅश नाही आहे ऑनलाईन पेमेंट करतो असे बोलतो व क्युआर कोड पाठवतो. त्यानंतर तो क्युआर कोड स्कॅन करून कन्फर्म करण्याकरिात १ रूपये पाठवा असे सांगतो. व्यापारी सांगितल्याप्रमाणे क्युआर कोड स्कॅन करून १ रूपये पाठवितो. १ रूपये पाठविल्यानंतर व्यापार्‍याच्या बॅंक खात्यातील २५ हजार रूपये कटतात तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे व्यापार्‍यास लक्षात येते.
आपली फसवणूक झाली आणि आपल्याला २५ हजार रूपयांनी कोणी तरी गंडवील्याचे लक्षात येतात तात्काळ व्यापार्‍याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर त्याच दिवशी तालुक्यातील दुसर्‍या व्यापार्‍यास सुध्दा असाच फोन आला होता मात्र त्याने समयसुचकता दाखवत पोलीसात तक्रार दाखल केल्याचे कळते.
अशाप्रकारे फसवणुक करणारी टोळी सक्रिय असुन नवनविन शक्कल लढवित आहेत. फसवणूक करणारी व्यक्ती आपली नावे सांगतांना रवि कुमार, संदिप सिंह असे सांगतात तसेच 7019940857, 7699467428 या क्रमांकावरून फोन आल्याचे कळते. तरी अशा ऑनलाईन फसवणूकीपासनू सावध राहणे गरजेचे आहे.

हाच तो क्युआर कोड

(the gdv, gadchiroli news, the gadvishva, QR Code Scam, kurkheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here