सुरजागड लोहखनिज वाहतुकीमुळे त्रस्त ; बोरी येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करून विविध मागण्या

167

– आविसं सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केला चक्का जाम
The गडविश्व
गडचिरोली-आलापल्ली, १२ जुलै : जिल्ह्यातील सुरजागड लोह खदान मधून होणाऱ्या लोहखनिज वाहतुकीमुळे आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गाची पूर्णतः चाळण झाली आहे. असे असताना दोन दिवसांपूर्वी या मार्गावर लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांची मोठी रांग असल्याने मार्ग पूर्णतः जाम झाला होता. अक्षरशः संपूर्ण ट्रकांनी रस्त्यावर कब्जा केल्याचे दृश्य पाहावयास मिळाले होते. यामुळे मात्र इतर वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागला तसेच जंगलाचा आधार घेत काही दुचाकी चालकांनी मार्ग काढला. याच विरोधात आविसं सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात मंगळवार ११ जुलै रोजी बोरी येथे चक्का भव्य जाम आंदोलन करून विविध मागण्या करण्यात आल्या.
आलापल्ली ते आष्टी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (C) या मार्गाने सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या जड वाहनांमूळे अनेक निरअपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अपघातात अनेक नागरिक अपंगत्व तसेच जखमी सुद्धा झाले आहेत. त्याचप्रमाणे आलापल्ली ते आष्टी या मार्गावरील अनेक गांवे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असून लोहखनीज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धुळीमुळे गावातील व या मार्गाने ये-जा करण्याऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांचे सन २०२३-२४ या वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून लगाम, बोरी तसेच राजपूर पॅच व इतर अन्य गावातील विद्यार्थांना नियमीतपणे शिक्षण घेण्यासाठी आलापल्ली व अहेरी येथील शाळेत ये-जा करावे लागते. मात्र सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमूळे आलापली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहेत त्यातच या मार्गावर नेहमीच हजारो अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना व अन्य नागरिकांना अपघाताची भीती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने लोहखनीज वाहतूक करणारे वाहन रस्त्यावर फसून असल्याने वाहनांची खूप मोठी रांग निर्माण होऊन या मार्गावरील वाहतूक ठप्प होत असल्याने विद्यार्थ्यांना व अन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थी सुद्धा शाळेच्या वेळेनुसार पोहचू शकत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्याचप्रमाणे अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम येथील लोहखनीज साठवणूक डंपींग यार्ड हे त्या गावातील नागरिकांना आणि त्या गावावरून ये-जा करणाऱ्या नागरिकासाठी शापच असल्याचे बोलले जात आहे कारण लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धुळीमूळे तसेच रस्त्यावर होणाऱ्या चिखलामुळे अनेक दुचाकी वाहन धारक यांचा तोल जाऊन अपघात होत आहे. त्यामुळे मद्दीगुडम येथील डंपिंग यार्ड लोहखनीज साठवणूक बंद करण्यात यावे अश्या प्रकारची मागणी येथील नागरिकांची आहे. तसेच मद्दीगुडम येथील वनविभागाच्या जागेवर अनेक लोहखनीज वाहतूक करणारे वाहने मोठ्या प्रमाणात उभी करण्यात येत आहे सदर वाहनावर बंदी घालण्यात यावे, तसेच मद्दीगुड्म येथील डंपिंग यार्ड ला नियमाचे उल्लंघन करून मंजूरी देण्यात आलेली आहे त्यामुळे मंजूरी देणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. आलापली ते आष्टी मार्गावरील लोहखनीज वाहतूक बंद करण्यात यावे कारण या मार्गांनी वाहतूक करणाऱ्या अनेक निरअपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात सदर मार्गाने ये-जा करणारे नागरिक अपघातामध्ये जखमी झाले आहेत. त्या निरपराध मृत पावल्या लोकांच्या कुटुंबातील व्यक्तींना ५० लाख रुपये व अपंगत्व आलेल्याना १५ लाख रुपये तसेच जखमी झालेल्या व्यक्तींना ५ लाख रूपयांची मदत देण्यात यावी, तसेच ज्या वाहनामुळे व वाहनचालकांमुळे अपघात झाला आहे. त्या वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावे, तसेच ज्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आलापल्ली ते सिरोंचा मार्गाचे काम चालू असल्यामुळे त्यानी अवजड वाहने या मार्गाने वाहतूक करण्यासाठी बंदी घातली आहे.त्याचप्रमाणे आलापली ते आष्टी मार्गावरील जड वाहनांना सुद्धा बंदी घालण्यात यावे. तसेच सूरजागड पहाड़ीकडे जाणाऱ्या जंगलातून नवीन रस्त्याच्या बांधकाम होत आहे परंतु या रस्त्याच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकाराची मंजूरी न घेता रस्ता तयार करण्यात येत आहे त्यांची चौकशी करून करवाई करण्यात यावी व वेलगुर टोला ते वडलापेठ रस्त्याची रुंदीकरण करून रस्ता तयार करण्यात येत आहे, रस्त्याच्या बाजूला लोकांची वस्ती व शाळा आहेत तसेच ग्राम पंचायत किंवा व ग्राम सभेकडून कोणत्याही प्रकारची नाहरकत प्रमाणपत्र न घेता सदर काम करत आहेत त्यामुळे ते मंजूर असलेला काम रद्द करण्यात यावे. तसेच अहेरी ते आलापल्ली, अहेरी ते सुभाषनगर, अहेरी ते खमनचेरू आणि अहेरी ते आवलमरी या रस्त्यांच्या बांधकामांना मंजूरी देऊन सदर सर्व रस्ते बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. वरील सर्व मुद्दे लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघटना व अजयभाऊ मित्र परिवार तसेच त्रस्त नागरिक यांच्यातर्फे आदिवासी वियार्थी संघटना सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी येथील सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात बोरी येथील मुख्य चौकात मंगळवार ११ जुलै रोजी भव्य चक्का आंदोलन करण्यात आले.
विशेष म्हणजे या आंदोलनात शांतता भंग होऊ याकरीता अहेरी येथील प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक किशोर मानभाव आष्टी येथील पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, साह्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण, आरती नरोटे, करीष्मा मोरे, जंगले, सचिन चौधरी, निलेश गायकवाड, मसाडे, अप्पासाहेब लोखडे, यांच्यासह प्राणहिता पोलीस मुख्यालय अहेरी, पोलीस स्टेशन अहेरी, आष्टी, मुलचेरा, उपपोलीस स्टेशन पेरलेली, राजाराम (खांदला), व्येंकटापूर पोलीस मदत केंद्र येथील येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या चोक बंदोबस्त ठेवण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रविंद्रबाबा आत्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, सुनीता कुसनाके, अहेरी नगरपंचायत चे नगराध्यक्ष रोजा करपेत, अहेरी नगर पंचायत चे नगर उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, सुरेखा आलाम, अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गिताताई चालूरकर, बोरी ग्रामपंचायत चे सरपंच शंकर कोडापे, पेरमिलीचे सरपंचा सौ.किरणताई कोरेत, रेपनपलीचे सरपंचा सौ.लक्ष्मी मडावी, कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम, लगाम धन्नूरचे सरपंचा कु.रोशनी कुसनाके, गोविंदगावचे सरपंच कु.शंकरीबाई पोरतेट, उपसरपंच तिरुपती अल्लूरी, उपसरपंच सचिन ओल्लेटीवार, पराग ओल्लालवार, माजी उपसरपंच अशोक येलमुले, माजी सरपंच प्रमोद आत्राम, रामलू कुळमेथे, माजी सरपंच जिलकरशाह मडावी, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, ग्रामपंचायत सदस्य मधूकर वेलादी, सुरेश गंगाधरीवार,कालीदास कुसनाके, प्रणाली मडावी, लक्ष्मी सड़मेक, श्रीनिवास राऊत, महेश लेकूरू, संजय गोंडे, राजेश दुर्गे, प्रमोद कोडापे, सुरेश तोगम, पांडूरंग रामटेके, वासुदेव सीडाम, गंगाराम मडावी, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, नरेश गर्गम, प्रकाश दुर्गे, जितू पंजलवार, नारायण चालूरकर, लक्ष्मण आत्राम सह बोरी, राजपुर पँच, महागाव(खुर्द), महागाव (बुज), जामगाव, शांतीग्राम, लगाम, धनूर, रामपूर चेक, रायपूर, शिवणीपाठ, ओडीगुडम, कोठारी, अहेरी, रेपनपल्ली, इंदारम, चिंतपेठ, वडलापेठ, मुत्तापुर, वेलगूर, राजाराम व अन्य गावातील समस्या ग्रस्त नागरिकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.

या आहेत मागण्या

१. सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धुळीमुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर धुळीचा
थर बसून शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होत आहे व त्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
२. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून सुरजागड लोहखनीज वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आलापल्ली,खमनचेरू,बोरी,राजपूर पॅच,लगाम ते आष्टी परिसरातील विद्यार्थी बस सेवे अभावी शिक्षणापासुन वंचित असून विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यास खूप त्रास सहन करावा लागत आहे. करीता अहेरी – आलापल्ली ते लगाम मार्गे बससेवा सुरू करण्यात यावे.
३. आलापल्ली ते आष्टी मार्गावरील लोहखनिज वाहतूक बंद करण्यात यावे.
४. मद्दीगुडम येथिल डंपिग यार्ड लोहखनिज साठवणूक बंद करण्यात यावे.
५. मद्दीगुडम येथिल वनविभागाच्या जागेवर ट्रक व इतर वाहनांचे पार्किंग बंद करण्यात यावे.
६. मद्दीगुडम येथिल जंगलतोड करून जंगलाचा नुकसान केलेल्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावे.
७. मागील वर्षात आलापल्ली ते आष्टी मार्गावरील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान भरपाई देण्यात यावे.
८. आलापल्ली ते आष्टी मार्गाचे रस्ता बांधकाम करण्यात यावे.
९. आलापल्ली ते आष्टी मार्गावरील आतापर्यंत लोहखनिज वाहतुकीमुळे अपघाती मृत्यु अपंगत्व आणि जखमी झालेल्या निरपराध
लोकांना नुकसान भरपाई म्हणून मृत व्यक्तीच्या कुटुंबांना 30,00,000/- कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींना 15,00,000/- व जखमी झालेल्या व्यक्तींना 5,00,000/- देण्यात यावे व वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावे.
१०. मद्दीगुडम येथिल नियमबाह्य डंपिंग यार्डला मंजूरी देण्याच्या अधिका-यावर कार्यवाही करण्यात यावी.
११. सुरजागड पहाडीकडे जाणाऱ्या जंगलातून नवीन रस्त्याचे बांधकाम हे मंजूरी न घेता रस्ता तयार करण्यात आलेला आहे.त्याची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी.
१२. वेलगूर टोला ते वडलापेठ रस्त्याचे रूंदीकरण व सुरजागड लोहखनीज वाहतूक चालू करण्याकरीता कोणत्याही प्रकारचे ग्रामपंचायतीचे नाहरकत किंवा तेथील नागरिकांच्या ग्रामसभा न घेता रस्त्याची मंजूरी देण्यात आलेला रस्ता जड वाहनांसाठी बंद करण्यात यावे.
१३. ज्याप्रमाणे आलापल्ली ते सिरोंचा मार्गाचे काम चालू असल्यामूळे त्यामार्गाने जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे,त्याचप्रमाणे आलापल्ली ते आष्टी मार्गावरील जड वाहनांना सुद्धा बंदी करण्यात यावे.
१४. अहेरी ते आवलमरी, अहेरी ते सुभाषनगर, अहेरी ते खमनचेरू तसेच अहेरी ते आलापल्ली रस्त्यांचे बांधकामांना मंजूरी देऊन सदर बांधकाम लवकरात लवकर चालू करण्यात यावे.
१५. आलापल्ली येथील खसरा डेपो मधील सागवन, बांबू व इतर प्रकारचे लठ्ठे व मौल्यवान वस्तूचे मद्दीगुडम लोहखनीज डंपींग यार्डमुळे नूकसान होत आहे.
१६. चौडमपल्ली येथे चपराळा अभ्यारण्य चा भाग असून तेथे वास्तावास असणाऱ्या प्राण्यांना रस्ता ओलांडतांना धोका आहे.व दिवसरात्र लोहखनीज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या आवाजामूळे व धुळीमूळे त्रास होत आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, ajay kankadalwar, ashti-apallli, aheri, bori)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here