तोपर्यंतच करता येईल तलाठी अर्जात दुरुस्ती : शुद्धीपत्रक केले जाहीर

1139

– संपुर्ण जाहिरात व सविस्तर सुचना व्यवस्थितपणे वाचून अर्ज भरण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, १२ जुलै : संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील महसुल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी २६ जून २०२३ ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तलाठी भरतीच्या अर्जात चुक दुरूस्तीची सुविधा नसल्याबाबत काही वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित केल्याने अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख, पुणे. यांनी शुद्धीपत्रक जारी करत त्याबाबत खुलासा जाहीर केला आहे.
शुद्धीपत्रकात म्हटले आहे की, “प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये तलाठी पदाकरीता आवश्यक अर्हता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज सादर करण्याची पद्धत, इत्यादीबाबत सविस्तर सुचना नमुद केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अर्जदारास नोंदणी (Registration) प्रक्रियेवेळी तसेच प्रत्यक्ष अर्ज भरुन झाल्यानंतर सादर (Submit) करण्यापुर्वी त्यांनी भरलेल्या माहितीबाबत खात्री करण्याकामी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर अर्ज भरताना अर्जदाराने संपुर्ण जाहिरात व सविस्तर सुचना व्यवस्थितपणे वाचून समजून अर्जाबाबतची माहिती काळजीपुर्वक व अचुक भरणे अपेक्षित आहे. तसेच अर्जदाराने अर्जाबाबत भरलेली माहिती त्याने शुल्क भरुन अर्ज अंतिमरित्या सादर करेपर्यंत दुरूस्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्जदाराने शुल्क भरून अर्ज सादर (Submit) केल्यानंतर त्याला अर्जामध्ये कोणतीही दुरूस्ती करता येणार नाही. त्याबाबत संकेतस्थळावर तसेच जाहिरातीमध्ये नमुद केलेले आहे.”
एकंदरीत शुल्क भरून अर्ज अंतिमरित्या सादर करेपर्यंत उमेदवाराला अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. एकदा अर्ज सादर केल्यास कोणताही बदल व दुरुस्ती करता येणार नाही, तसेच संपुर्ण जाहिरात व सविस्तर सुचना व्यवस्थितपणे वाचून उमेदवाराने अर्ज भरण्याचे आवाहनही आनंद रायते, भाप्रसे, अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख, पुणे यांनी शुद्धीपत्रकातून केले आहे. शुद्धीपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्धही करण्यात आले आहे. शुद्धीपत्रक

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, talathi recruitment 2023)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here