कुरखेडा तालुक्यात “सेवा पंधरवडा” कार्यक्रमाची यशस्वी सांगता
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०२ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या “सेवा पंधरवडा” मोहिमेचा समारोप आज कुरखेडा तहसील कार्यालयात उत्साहात झाला. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या निमित्ताने विद्यार्थी व नागरिकांना जात, अधिवास तसेच नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मोहिमेचा तिसरा व अंतिम टप्पा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान पार पडला. समाजातील दुर्बल घटकांना केंद्रस्थानी ठेवून विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर देण्यात आला.
या कार्यक्रमात नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप शिंदे, मंडळ अधिकारी रविंद्र नवले, विवेक उन्हाळे, लोकेश खरकाटे, वर्षा किंरगे, नरेंद्र ठकारे तसेच सर्व तलाठी, कर्मचारी व “आपले सरकार” सेवा केंद्राचे चालक दिक्षा चौधरी, व्यंकटेश दुर्गे व सुरज धोंडणे उपस्थित होते. लाभार्थी व विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
“सेवा पंधरवडा” अंतर्गत पाणंद रस्ते विशेष मोहीम, ई-गव्हर्नन्स सेवा व डिजिटल उपक्रमांमुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास मदत झाली. या मोहिमेमुळे प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमधील विश्वास व समन्वय अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट झाले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














