लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या मयुरी प्रभू ठाकरे ची यशोगाथा

411

– दुसऱ्याच प्रयत्नात पोलीस वाहन चालक व पोलीस शिपाई मध्ये मारली बाजी

मी मयुरी प्रभू ठाकरे रा. विसापूर.पोस्ट कोटगल ता. जि. गडचिरोली. माझे पहिले ते चौथी पर्यंतचे शिक्षण विसापूर येथील जिल्हा परिषद शाळेत येथे झाले तर हायस्कूल महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण सोलापूर कॉम्प्लेक्स येथील जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे पूर्ण झाले. गडचिरोली जिल्ह्याला पोलीस जिल्हा ओळख प्राप्त झालेली असल्याने आणि शाळेत शिकत असतानापासूनच पोलिसांना बघतच मी मोठी झालेली आहे. त्यामुळे मला पोलीस वर्दीचे आकर्षण लहानपणापासूनच होते. बारावी पास झाल्यानंतर मी पोलीस भरतीच्या तयारीला लागली. मी तयारीला लागली तेव्हा मला भरतीची तयारी कशी करायची याबद्दल फारसे मार्गदर्शन नव्हते. मी गडचिरोली येथील एका स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात पोलीस भरती बद्दल तयारी करत असताना राजीव सर तिथे मराठी व्याकरण हा विषय तसेच कला शाखा घटक हा विषय शिकवत असायचे. आणि त्या माध्यमातूनच माझी सरांशी ओळख झाली त्यानंतर २०२० या वर्षात देशात कोरोनाचे संकट आले आणि त्या काळात सर्व क्लासेस बंद असल्याने अभ्यासात सुद्धा खंड पडलेला होता. स्वतः सेल्फ स्टडी करायची परंतु त्यात प्रत्येक विषय समजायला अडचणी येत असत त्याचबरोबर मी स्वतः मैदानी चाचणीची तयारी करीत असे. तयारी करतच असताना २०१९ ची पोलीस भरतीची जाहिरात २०२२ मध्ये घेण्यात आली आणि मी शिपाई पदाकरिता परीक्षेचा फॉर्म भरला. अभ्यासाला लागली तेव्हा सुरुवातीला लेखी परीक्षा असल्याने मला अपेक्षित असे मार्क मिळाले नाही. मैदानी चाचणीत मला ५० पैकी ४९ गुण मिळाले. ही माझी पहिलीच पोलिस पोलीस भरती असल्याने अनुभव सुद्धा नव्हताच. मला लेखी मध्ये तीन गुण कमी मिळाल्याने मी अंतिम गुणवत्तेत स्थान मिळवू शकलेली नाही. त्यानंतर लगेच काही महिन्यातच २०२३ करिता गडचिरोली जिल्ह्याकरीता पोलीस भरती जाहीर झाली. मी परत एकदा मनापासून मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या तयारीला लागली परंतु मला माहीत होते की मी स्वतः मैदानी चाचणीची तयारी करू शकतो परंतु मला लेखी परीक्षेकरिता योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता होती त्यामुळे मी राजीव सरांना कॉल केला आणि मला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे मी राजीव सरांना सांगितले. त्यावेळी सरांनी काळजी करू नको मी मार्गदर्शन करतो आणि त्यानंतर मी लक्ष्यवेध अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला आणि राजीव सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी मराठी व्याकरणाचा तसेच इतर विषयाचा तर गेडाम सर यांच्या मार्गदर्शनाखाली अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाची तयारी केली. राजीव सर, गेडाम सर यांच्या मार्गदर्शनामुळे २०२३ च्या भरतीमध्ये माझी नुकतीच पोलीस वाहनचालक व पोलीस शिपाई या दोन्ही पदी माझी निवड झालेली आहे. माझ्या या यशामध्ये मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन दिल्यामुळे मी राजीव खोबरे सर आणि लक्ष्यवेध अकॅडमीचे खूप -खूप मनापासून आभारी आहे. माझ्या या यशात माझ्या आई- वडिलांचा आणि माझ्या बहिणींचा माझ्या मित्र मैत्रिणीचा महत्त्वाचा वाटा आहे.

– मयुरी प्रभू ठाकरे, मु. विसापूर पोस्ट कोटगल त. जि. गडचिरोली
(निवड- वाहन चालक व पोलीस शिपाई)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here