गडचिरोली : जागतिक हिवताप दिन साजरा

150

The गडविश्व
गडचिरोली, २५ एप्रिल : दर वर्षी २५ एप्रिल हा दिवस “जागतिक हिवताप दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. हिवताप नियंत्रण तसेच निर्मूलनासाठी निरंतर प्रयत्न आणि वचनबद्धता याची आठवण करून देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. “हिच वेळ खरी, मलेरिया झिरो करण्याची, गुंतवणूक करा, कल्पकतेने अमलात आणा” ही या वर्षीची मुख्य संकल्पना आहे. जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून गडचिरोली शहरातून प्रभातफेरी काढून हिवताप आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. यात जिल्हा सामान्य रुग्णालय येथील परिचर्या प्रशिक्षणार्थी, समुदाय आरोग्य अधिकारी प्रशिक्षणार्थी, शहरी भागातील आशा स्वयंसेविका, सर्व अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्या हिवताप विषयक घोषवाक्याच्या निनादात हि प्रभातफेरी मुख्य मार्गाने फिरवून महिला व बाल रुग्णालयात सांगता करण्यात आली.
रुग्णालयाच्या सभागृहात जागतिक हिवताप दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा हिवताप कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच महिला व बाल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे तर प्रमुख अतिथी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जठार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे, बालरोग तज्ञ डॉ. पेंदाम, साथरोग अधिकारी डॉ. रुपेश पेंदाम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक मंचावर उपस्थित होते.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी प्रस्ताविकेत्तून जिल्ह्यातील हिवताप परिस्थिती सांगितली. यावेळी इतर मान्यवरांनी हिवताप आजारा बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांनी हिवताप रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी व हिवतापाने मृत्यु चे प्रमाण कमी करण्यासाठी नवीन संकल्पनांचा वापर करणे यावर मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी हिवताप आजाराबाबत मार्गदर्शन केले.सन २०२२-२३ या वर्षात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप व हत्तीरोग आजार प्रतिबंध बाबत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्रीमती रुक्सार शेख, आशा स्वयंसेविका प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव, श्रीमती रम्मी पुंगाटी, आशा स्वयंसेविका प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी, श्रीमती रजनी पुंगाटी, आशा स्वयंसेविका प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी, श्रीमती नंदा नैताम, आशा स्वयंसेविका प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा, विनायक कुंभारे, संतोष दुर्गे, वितराज कुनघाडकर, सुरटकर, संदीप धात्रक, एस. डी. वैरागडे , कालिदास राऊत, कुमरे, निकेश गंदेवार, अशोक पवार, डोके वड्डे, उंदिरवाडे यांना मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राजेश कार्लेकर यांनी केले. आभार प्रमोद सयाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (Bayern vs Man City) (Inter vs Benfica) (JEE MAINs Answer Key) (Mohammed Siraj) (Solar eclipse of April 20, 2023) (Roman Reigns) (Mamata Banerjee) (The Song of Scorpions) (Gadchiroli: Celebrating World Malaria Day)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here