संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेचे अनुदान आता डिबीटीवर

750

– लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत डिसेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ पासून अनुदानाची रक्कम थेट ‍डिबीटी (Direct Benefit Transfer) पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
तथापि, ज्या लाभार्थ्यांनी अद्याप त्यांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, बँक खाते, पासबुक तसेच लाभार्थी विधवा किंवा दिव्यांग असल्यास आवश्यक त्या प्रमाणपत्रांसह संबंधित ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसील कार्यालयात कागदपत्रे सादर केली नाहीत, अशा लाभार्थ्यांचे अनुदान फेब्रुवारी २०२५ अखेरपासून बंद होणार आहे.
तरी सर्व संबंधित लाभार्थ्यांनी पुढील सात दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागाकडे सादर करावीत. डिबीटी पोर्टलकरिता शिल्लक लाभार्थ्यांची यादी संबंधित ग्राम महसूल अधिकारी कार्यालयातून उपलब्ध आहे. लाभार्थ्यांना अडचण आल्यास आपल्या संबंधित कोतवाल व ग्राम महसूल अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here