मुरुमगावच्या विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद

88

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०७ : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुरुमगाव शाळेच्या विद्यार्थ्यांची ५ फेब्रुवारी २०२५ रोजी शैक्षणिक सत्र २०२४ – २५ ची सहल गोसेखुर्द इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्प, धरण, पॅराडाईज टायगर वॉटर पार्क करांडला व आंभोरा वॉटर पर्यटन स्थळ इ. ठिकाणी नेण्यात आली.
बऱ्याच वर्षानंतर विद्यार्थ्यांची शाळेतर्फे सहल गेल्यामुळे विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक रेवनाथ चलाख यांच्या मार्गदर्शनात ही सहल नेण्यात आली.
याप्रसंगी शाळेचे पदवीधर शिक्षक चंदु रामटेके, पदवीधर शिक्षीका गायत्री खेवले, शिक्षीका रविता शेडमाके, सुमन किरंगे, संगिता भडके, रुपेश शिवणकर, जगदीश बावणे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here