“एकीचे बळ” : म्हशींनी दिलेल्या झुंजीत शिकारी वाघाचा मृत्यू

1789

The गडविश्व
ता.प्र / मूल, २१ जुलै : एकीची बळ असल्यास मोठ्यातील मोठी समस्या दूर करण्याचे धाडस निर्माण होते. अशाचप्रकारची घटना मूल तालुक्यातील परिसरात वाघाबाबत घडली. वाघ शिकारीसाठी गेला असता म्हशींनी एकीचे बळ निर्माण करत त्या जंगलाचा राजा म्हणणाऱ्या वाघाशी झुंज दिली यात वाघ गंभीर झाला. दरम्यान या झटापटीत वाघाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २० जुलै रोजी घडली. वाघ हा गाय म्हशींच्या काळापाजवळ असलेला व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मूल तालुक्यातील बेंबाळ शिवारात २० जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास काही गायी व म्हशींचा कळप चरत असतांना वाघाने एका म्हशीवर हल्ला केला. मात्र ते म्हणतात न एकीचे बळ असले की मोठ्यातले मोठे संकट दूर करण्याची ताकद निर्माण होते त्याचप्रमाणे ही घटना घडली. वाघाने म्हशीवर हल्ला करताच इतर म्हशी त्यावर तुटून पडल्या म्हशींच्या एकीच्या बळाने वाघाला हार मानावी लागली. वाघ आणि म्हशींच्या झुंजीत वाघ गंभीर जखमी झाला. याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती होताच घटनास्थळी तोबा गर्दी झाली. गर्दीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते मात्र वनविभागाचे पथक दाखल होत वाघावर उपचार करण्यापूर्वीच सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वाघाचा मृत्यू झाला. वाघ आणि म्हशी एकत्र असल्याचा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात वायरल. त्यात वाघ हा गाय म्हशींच्या कळपाजवळ आढळून येत आहे तेव्हा तो जखमी अवस्थेत असावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here