The गडविश्व
गडचिरोली, ७ एप्रिल : गडचिरोली शहरात तसेच ग्रामीण भागात घरपोच सिलेंडर पोहचवून देण्याकरिता ग्राहकांकडून अधिकचे पैसे घेतले जाते. यामुळे आधीच गॅस चे दर गगनाला भिडले असतांना आणखी खिशाला कात्री बसत असून ही लूटमार थांबविण्यात यावी व अधिकचे पैसे घेणाऱ्या गॅस एजन्सीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचिरोली विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके यांनी केली आहे. तसे न झाल्यास संबंधित एजन्सीला टाळे ठोकू असा इशारा सुद्धा दिला आहे.
जिल्हाभरात हल्ली अनेकांकडे गॅस वर स्वयंपाक केल्या जाते. गॅस चे दर गगनाला भिडले आहे यामुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजनही बिघडले आहे. अशातच गॅस सिलेंडर घरपोच पोहचून देण्याकरिता अधिकचे पैसे घेत असल्याचा प्रकार दिसून येत असून ही ग्राहकांची आर्थिक लूट आहे. यामुळे आणखी ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. एका ग्राहकडून अधिकचे ३० ते ५० रुपये घेतले जातात तर ग्रामीण भागात यापेक्षा अधिक. मात्र अधिकचे पैसे घेत असल्याची कोणतीही पावती ग्राहकांना देण्यात येत नाही मग ते अधिकचे पैसे कशाचे अशी विचारणा केली असता घरपोच पोहचून देण्याचे असे उत्तर देत असतात मात्र संबंधित गॅस एजन्सीला ग्राहकाने दिलेल्या किमतीत घरपोच गॅस सिलेंडर पोहचून देणे बंधनकारक आहे. मात्र तसे न होता अधिकचे पैसे घेतल्या जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचिरोली विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके ही गंभीर बाब उजेडात आणून कोणीही घरपोच गॅस पोहचून देण्याचे अधिकचे पैसे देऊ नये, अधिकच्या पैशाची मागणी केल्यास त्याची पावती मागण्यात यावी अथवा याबाबत मला कळवावा असे आवाहन केले आहे. सोबतच गडचिरोली येथील गॅस एजन्सीची सखोल चौकशी करण्यात यावी व अधिकचे पिसे घेत असल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. जास्तीचे पैसे घेणे बंद न झाल्यास गॅस एजन्सीला टाळे ठोकू असा इशाराही दिला आहे.
त्यामुळे आता एकूणच या प्रकरणी ग्राहक काय खबरदारी घेते ? घरपोच सिलेंडर चे अधिकचे पैसे देणार काय ? घरपोच सिलेंडर पोहचून दिल्यानंतर पोहच करणारा अधिकच्या पैशाची मागणी करणार काय ? की गॅस च्या किमतीतच पोहच करून देणार ? असे विविध प्रश्न उपस्थित होत असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(The Gadvishva) (the gdv) (rupesh walke) (gas )