आरमोरी -आस्टा-कासवी मार्गे जाणारी बस सेवा तात्काळ सुरू करा

112

– सभापती भारत बावनथडे यांची मागणी
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, २८ ऑगस्ट : आरमोरी ते वडसा बस सेवा अंतरजी, आस्टा, कासवी व उसेगाव मार्गे अनेक दिवसांपासून शालेय विद्यार्थ्यांकरिता सुरू होती. शालेय सत्र सुरू होऊन तीन महिने लोटले त्याचप्रमाणे या जंगलव्याप्त मार्गावर वाघाचे व इतर जंगली प्राण्यांचे वास्तव्य आहे असून बसअभावी शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे निर्माण होत असल्याने आरमोरी -आस्टा-कासवी मार्गे जाणारी बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा महामंत्री तथा नप सभापती भारत बावनथडे यांनी केली आहे.
आरमोरी तालुक्यात वाघाचे वास्तव्य आहे. कासवी व आस्टा येथून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता आरमोरी व इतर ठिकाणच्या विद्यालयात ये-जा करावे लागते परंतु जंगली प्राण्यांच्या भीतीने नागरिकांना व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करत असतात. त्यामुळे आरमोरी येथून वडसा, आस्टा-कासवी -उसेगाव मार्गे जाणारी बस लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर बस सुरू झाल्यास जंगल परिसरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना सोयीस्कर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here