एसटी महामंडळाच्या भंगार बसने भिवापुर-उमरेड मार्गावर प्रवाशाचे केले बेहाल

191

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १८ जुलै : गडचिरोली येथुन नागपुर ला जाणारी बस उमरेड-भिवापुर मार्गावर बंद पडल्याने या भंगार बसने प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागला सोबतच जीव टांगणीला लागला होता.
१७ जुलै रोजी गडचिरोली आगाराची बस क्रमांक एमएच ४०एक्स ६४१५ हि बस गडचिरोली येथुन सकाळी सुटून दुपारी उमरेड-भिवापुर मार्गावर बंद पडली तसेच या गाडीच्या मागील टायरचा वरचा पट्टा निघाला आणि त्यानंतर थोड्या दूर गाडी तशीच आणली व त्यानंतर नवेगाव साधू या गावाजवळ गाडी अचानक रेस झाल्याने प्रवासी घाबरून गेले स्वताच्या जीव मुठीत घेऊन पटापट गाडीमधून उतरलेत. गाडी आपोआप रेस झाल्याने पाच मिनिटापर्यंत रेस होतो त्यामुळे प्रवाशात भिंती निर्माण झाली होती. त्यानंतरही जर बस दहा मिनिटे तशीच रेस होत राहिली असती तर इंजिन फुटले असते असे बस चालकाने सांगितले. त्यामुळे गडचिरोली आगाराच्या बसेस पूर्णपणे भंगार अवस्थेत आहे. हीच बस सकाळी गडचिरोली वरून ८.०० वाजता सुटणार होती परंतु ती ९.०० वाजता सुटली याचे कारण चौकशी कक्षात विचारले असता बस दुरुस्त करीत असल्याचे सांगितले. बस दुरुस्त झाल्यावर ती सोडण्यात येईल त्यानुसार बस आगारातून सोडल्या नंतर गडचिरोली वरून निघाली आणि उमरेड जवळ येऊन ती भंगार बस बंद पडली. अशा अवस्थेत गडचिरोली आगार प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. अशा पद्धतीने एसटी महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी आहे कि प्रवाशांच्या प्रवासात विघ्ने निर्माण करणारी असल्याचे दिसून येते. यामुळे प्रवाशांना विविध समस्याचा सामना करावा लागला. अशा भंगार बसेसचा प्रवाशांच्या होणार त्रास थांबविण्यासाठी आगार प्रमुखांनी याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
महामंडळ च्या भंगार बसने प्रवास करुन स्वताच्या जिव धोक्यात टाकत असल्याचा अनुभव आल्याची आपबिती प्रतिक्रिया बस प्रवासी भविकदास करमरकर यांनी दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here