रांगी येथे निःशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

49

रांगी येथे निःशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
The गडविश्व
धानोरा, दि. १२ : धानोरा तालुक्यातील रांगी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि समता फाउंडेशन, महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निःशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात एकूण १६३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८९ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांना नागपूर येथील महात्मे नेत्र रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
११ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत रांगी आरोग्य केंद्रात शिबिर पार पडले. तपासणीदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रियेसाठी लेन्सची निवड करण्यात आली.
या शिबिरासाठी डॉ. फंड व त्यांचा वैद्यकीय चमू यांनी सेवा दिली. यावेळी शैलेश जांभुळे (तंत्रज्ञ अधिकारी), अंकित हेमके (औषधी निर्माता), भाऊजी हिचामी (आरोग्य सहाय्यक), सुरेश राजगडे (आरोग्य सहाय्यक) आणि भूषण धाईत (परिचर) यांची उपस्थिती होती. अशा आरोग्य उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना निःशुल्क उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा मिळत असून रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.

#thegdv #thegadvushva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here