गडचिरोली जिल्ह्यात अवैध खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी ‘सहा’ खनिज डेपो

124

The गडविश्व
गडचिरोली दि. ०७ : गडचिरोली जिल्ह्यातील खनिज उद्योग अधिक कार्यक्षम आणि नियमनबद्ध करण्याच्या दृष्टीने आणि अवैध खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज सहा खनिज डेपो कार्यान्वित केले. या सहा डेपोच्या विक्री करारावर जिल्हाधिकारी पंडा यांनी एक महिनापूर्वी कार्यभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केली होती. आता शेवटी गडचिरोली जिल्ह्यात हे सहा डेपो कार्यान्वित होणार आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून हे डेपो सुरु व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आवश्यक मंजुरी, पायाभूत सुविधा आणि नियामक प्रक्रियांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. या योजनेमुळे जिल्ह्यातील खनिज वाहतूक अधिक पारदर्शक होणार आहे.

नव्याने सुरु झालेले डेपो

आंबेशिवणी (ता. गडचिराेली ), दुधमाळा (ता. धानोरा), वाघोली (ता. चामोर्शी), सावंगी, कुरुड (दोन्ही ता. देसाईगंज), देऊळगाव (ता. आरमोरी) या ठिकाणी डेपो सुरु करण्यास मंजुरी मिळाली आहे.

कोठे किती उत्खनन होणार

आंबेशिवणी डेपोमध्ये ७८९७ ब्रास रेतीचे उत्खनन करण्यास परवानगी मिळाली आहे, तसेच दुधमाळा येथे ३११० ब्रास, वाघोली २२७९२ ब्रास, सावंगी येथे १४१३४ ब्रास, कुरुड येथे १६५३७ ब्रास तर देऊळगाव येथे १९५२३ ब्रास रेती उपसा करता येणार आहे.

चेकपोस्ट निर्मिती, ईटीपी तपासणी बंधनकारक

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अवैध रेती वाहतूक व उत्खनाला आळा घालण्यासाठी चेकपोस्ट निर्मिती केली असून ईटीपी तपासणी देखील बंधनकारक केली आहे. चेकपोस्टवर हलगर्जी केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. मंडळाधिकाऱ्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून तर तहसीलदारांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here