धक्कादायक : घोडाझरी तलावात चार जण बुडाले

2379

– सेल्फी चा नाद नडला
The गडविश्व
नागभीड, १६ जुलै : तालुक्यातील घोडाझरी तलावात चार जण बुडाल्याची धक्कादायक घटना रविवार १६ जुलै रोजी घडली. सेल्फी काढण्याच्या नादात सदर घटना घडल्याचे बोलल्या जात आहे. मनीष श्रीरामे (२६), धीरज झाडे (२७), संकेत मोडक (२५), चेतन मांदाडे (१७) असे बुडाल्यांची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावाची पाण्याची पातळी वाढल्याने अनेक पर्यटक त्याठिकाणी येत असतात. रविवार असल्याने शेगाव येथील आठ युवक पार्टीसाठी घोडाझरी तलाव येथे आले होते. दरम्यान घोडाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात एक जण घसरून पडला त्याच्या पाठोपाठ तीण जण बुडाले. तर सोबतच्या सहकाऱ्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने त्यांचा थांगपत्ता लागला नाही. सदर घटनेची माहिती होताचा पोलीस घटनास्थळी दाखल झाली. बुडाल्यांची शोध मोहित सुरू असल्याचे कळते.
घोडाझरी तलावात पावसाच्या हंगामात अनेकजण येत असतात मात्र यात अशा घटनाही यापुर्वीही झाल्या आहेत. रविवार असल्याने याठिकाणी पर्यटकांची मोठी झुंबड पाहावयास मिळते.
(the gdv, the gadvishva, chandrapur, nagbhid, ghodazari talav, Shocking: Four people drowned in Ghodazari lake)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here