मुरुमगाव येथील स्व. दखने विद्यालयातील सुरनकर मुख्याध्यापक पदावरून निलंबित

606

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३० मे : तालुक्यातील मुरुमगाव येथील आदिवासी विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित सुरू असलेली स्वर्गीय रामचंद्र दखणे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक.एस.जी. सुरणकर यांना मुख्याध्यापक पदावरून निलंबित करण्यात आले आहे.
एस.जी.सुरणकर हे मागिल १५ ते २० वर्षापासून स्व.रामचंद्र दखने विद्यालय मुरुमगाव येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. येथे वर्ग ८ ते १२ सुरू असून येथील कर्मचारी आणि संस्थेतील प्रकरण न्यायालयात सुरू होते. न्यायालयीन प्रकार निघाली निघाल्यानंतर चिंचोळकर यांना परत शाळेत रुजू करण्यात आले. तर एस .जी. सुरणकर यांना मुख्याध्यापक पदावरून मुक्त करण्यात आले. याचे कारण वेगळे सांगितले जातात. त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. त्यात कारणांचा ठपका त्यांच्यावर ठेवून मुख्याध्यापक पदावरून हकलपट्टी करण्यात आल्याचे कळते. त्यांच्याकडील प्रभार आता एम.डी. जांभुळकर यांचे कडे सोपविण्यात आलेला आहे. स्वर्गीय रामचंद्र दखणे तथा कनिष्ठ महाविद्यालयीन संचालक मंडळ तथा पदाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेतला असल्याचे मत गावकरी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केले आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news updates, dhanora murumgao)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here