The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या एक दिवसीय विनमंकट क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशन च्या १९ वर्षाखालील राज्य संघात गडचिरोलीच्या आदित्य तितीरमारे याची निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धा दिल्ली येथे ४ ते १२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत खेळण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा आदित्य तितीरमारे हा डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज असून उत्कृष्ट फलंदाज सुद्धा आहे. तो गडचिरोली येथील क्रिकेट क्लब चा नियमित खेळाडू असून त्याला त्याच्या परिश्रमाचे पुरस्कार मिळाला आहे.
विदर्भ विनूमांकड १९ वर्षाखालील संघामध्ये देवांश ठक्कर, तुषार सूर्यवंशी, तुषार कडू, श्री चौधरी, श्रेयांश गुप्ता, वेदांत दिघाडे,संस्कार चवटे,अंकुर सिंग, आदित्य तितीरमारे, यश तितरे, सार्थक धाबडगावकर, पार्थ खुरे,आदित्य नरवडे, मल्हार दोशी, अथर्व पोडूतवार यांचा समावेश आहे.
हा संघ विदर्भ क्रिकेट असोसिएशन १९ वर्षाखालील विनू मानकड एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे प्रतिनिधित्व करणार आहे. आदित्य तितीरमारे च्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत असून गडचिरोली जिल्ह्यात त्यांने मानाचा तुरा रोवला आहे. असेच खेळाडू पुन्हा पुन्हा निर्माण होतील अशी ग्वाही विदर्भ विकेट असोसिएशनचे जिल्हा संयोजक मंगेश देशमुख यांनी दिली आहे.
