कुरखेडा येथील प्रतिष्ठित किराणा व्यावसायीक राजकूमार रामचंदानी यांचे दुःखद निधन

771

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०८ : शहरातील प्रतिष्ठित किराणा व्यावसायिक राजकूमार जौकीमल रामचंदानी (५६) यांचे आज सोमवार ०८ जुलै रोजी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
राजकूमार जौकीमल रामचंदानी हे नेहमीप्रमाणे आपल्या किराणा दुकानात होते. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कुरखेडा येथेच प्रथम प्राथमिक उपचार करीत ब्रम्हपूरी येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात येत होते मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचा पश्चात दोन मूले, एक मूलगी ,भाऊ, बहीन, सूना, नातवंड व मोठा आप्तपरीवार आहे. त्यांचा पत्नीचे काही वर्षापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या पार्थीवावर उद्या मंगळवार ०९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सती नदी घाटावर अंतीम संस्कार करण्यात येणार आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here