गडचिरोली जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी : अतिवृष्टी व पुराचा धोका, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

1127

The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असून, २४ जुलैसाठी ऑरेंज अलर्ट तर २५ जुलैसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली असून, उद्या अत्याधिक मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नद्या-नाले दुथडी भरून वाहण्याची शक्यता असून, वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी नद्यांच्या उपखोऱ्यांमध्येही पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले असून, विशेषतः नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कतेचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले आहे. पुराच्या पाण्यातून प्रवास करणे टाळावे, पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत तो ओलांडू नये, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुसळधार पावसाच्या काळात नदी, तलाव, बंधारे इत्यादी ठिकाणी जाणे टाळावे आणि पर्यटकांनी आवश्यक ती सतर्कता बाळगावी. पावसात सेल्फी काढण्याचा मोह देखील टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी 07132-222031 किंवा 07132-222035 या क्रमांकांवर तसेच 9423911077, 8275370208, 8275370508 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.
मान्सून कालावधीतील पावसाची आकडेवारी, धरण व नद्यांची पाणीपातळी, रस्ते वाहतुकीची स्थिती, हवामान अंदाज यासह सर्व अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलला https://whatsapp.com/channel/0029VbAPkzTKGGG8KdTvgY41 या लिंकवर क्लिक करून फॉलो करता येईल.
#thegdv #thegadvishva #gadchirolnews #Gadchiroli #Gadchiroli #RedAlert #HeavyRain #FloodAlert #WeatherUpdate #IMDAlert #DisasterManagement #MaharashtraRain #GadchiroliFloods #StaySafe #Monsoon2025 #EmergencyAlert #RainWarning #गडचिरोली #पुराचा_धोका #मुसळधारपाऊस #हवामानइशारा #आपत्तीव्यवस्थापन #गडचिरोली #रेडअलर्ट #अतिवृष्टी #पूरइशारा #हवामानअलर्ट #आपत्तीव्यवस्थापन #पावसाचा_इशारा #मुसळधारपाऊस #पूरस्थिती #सतर्कता #गडचिरोलीवृष्टी #पावसाचेआव्हान #नदीपात्र #पूरधोका #मान्सून२०२५ #सावधराहा #विजांचा_कडकडाट #गडचिरोली_पुर #आपत्कालीनमाहिती #जिल्हाप्रशासन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here