– अनावश्यक प्रवाास व नदीकाठावर जाणे टाळा
गडविश्व
गडचिरोली, १८ जुलै : हवामान विभागाने नुकताच गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयाला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान नागरिकांची उचित सतर्कता बाळगून अनावश्यक प्रवास टाळावा तसेच नदीकाठावर जाणेही टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
१७ जुलै रोजी जिल्हयात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने अनेक भागात पाणी साचले तर पुरपरिस्थितीही निर्माण झाली त्यामुळे मार्गही बंद झाले. दरम्यान नदया, नाले फुगल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळुन पाणी असलेल्या ठिकाण व नदी, नाले ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाचा रेड अलर्ट : सतर्कता बाळगा#gadchiroli #chandrpur@InfoChandrapur @InfoGadchiroli pic.twitter.com/OU2UDP2llr
— THE GADVISHVA (@gadvishva) July 18, 2023
(red alart, the gdv, the gadvishva, gadchiroli news, chandarpur)