प्रकल्पाच्या काठावरील गावातील नागरीकांनी तसेच पर्यटकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन

164

The गडविश्व
गडचिरोली, १८ जुलै : सध्या मान्सुन कालावधी सुरु असुन गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसंपदा विभागांतर्गत चामोर्शी तालुक्यातील दिना प्रकल्प (क.क.जलाशय) हा १८ जुलै २०२३ रोजी सकाळी ६.०० वाजता १०० टक्के भरलेला असुन जिल्ह्यातील इतर प्रकल्पांच्या पाणी साठयामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे.
दिना प्रकल्प पाहण्याकरीता पर्यटक/ स्थानिक नागरीक यांची ये-जा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्प १०० टक्के भरलेला असल्याने वेळोवेळी येणाऱ्या पावसामुळे सांडव्यावरुन विसर्ग कमी-जास्त प्रमाणात प्रवाहित होत असतो. तेव्हा यासंदर्भात प्रकल्पाच्या काठावरील गावातील नागरीकांनी तसेच पर्यटकांनी उचित सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी असे गडचिरोली पाटबंधारे विभाग, गडचिरोली यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here