आरमोरीत आनंदाचा शिधा वाटप सुरू

303

– गणेश उत्सवाच्या मुहर्तावर शासनाचा उपक्रम
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १६ सप्टेंबर : गणेश उत्सवाच्या मुहर्तावर रवा, चणा डाळ, पामतेल व साखर अशा चार वस्तूंची किट अवघ्या शंभर रुपयांत रेशन दुकानांमार्फत गरजूंना उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आरमोरी तालुक्यात शिधा वाटप सुरू करण्यात आला. नगर परिषद चे सभापती भारत बावनथडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिधा किट देऊन शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुरवठा निरीक्षक म्हणून दीपक नागरगोजे, पुरवठा व्यवस्थापक प्रफुल खांदवे, रेशन संघटना अध्यक्ष दादाजी माकडे, तामशेवर मैंद आदी लाभार्थी उपस्थित होते. तालुक्यातील ९५ रेशन दुकानामध्ये किट उपलब्ध झाले असून २१८३३ कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती आहे. यावेळी किट मुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here