जलद बचाव दलाने महिनाभरात वाचविले ४४ साप, २ घोरपड आणि २ पक्षी

325

The गडविश्व
गडचिरोली, ५ जुलै : गडचिरोली शहरात तसेच आजू बाजूच्या गावातील घरांमध्ये शिरलेल्या तसेच आजारी व जखमी अवस्थेत मिळालेल्या प्राण्यांना वाचविण्यासाठी गडचिरोली वनविभागाने जलद बचाव दल स्थापन केले असून या दलाच्या सदस्यांनी महिनाभरात तब्बल ४४ साप, २ घोरपड आणि २ पक्ष्यांना जीवनदान दिले आहे. या पैकी ३० साप हे बिनविषारी होते.
सदर मोहीम उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनात पार पाडण्यात आली. यासाठी सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी धीरज ढेंबरे, जलद बचाव सदस्य अजय कुकडकर , मकसुद सय्यद, पंकज फरकाडे, गुणवंत बाबनवाडे, निखिल बारसागडे, कुणाल निमगडे सर्पमित्र सौरभ सातपुते, विपुल उराडे यांनी परिश्रम घेतले.
गडचिरोली जिल्हा हा जंगलाने व्याप्त असल्याने नेहमीच घरामध्ये, शेतशिवारात तसेच घराच्या परिसरात सरपटणारे प्राणी आढळून येत असतात. अशावेळी जलद बचाव दलाचे सदस्य घटनास्थळी जाऊन अशा प्राण्यांना पकडुन निसर्गात सोडतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने घरांमध्ये सरपटणारे प्राणी शिरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. अशा वेळी घाबरून न जाता वनविभाग किंव्हा सर्पमित्रांना संपर्क करावे, असे आवाहन गडचिरोली वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here