The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०१ : तालुक्यातील रांगी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत पूर्वतयारी मेळावा क्रमांक दोन चे यशस्वी आयोजन करण्यात आले. यात नवागत विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
नविन सत्रातिल पहिल्या दिवशी शाळा पूर्वतयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्या करिता जिल्हास्तरावरून नांदेकर व गिरडकर, पिंपळशेंडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तसेच तालुकास्तरावरून श्रीमती दुगा मॅडम यांनी शाळेला भेट देऊन शाळेच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे संपूर्ण सदस्य गण, शिक्षक ,पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज जेवणामध्ये विद्यार्थ्यांना पुलाव व गोड पदार्थांमध्ये जिलेबी कढी वितरित करण्यात आले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews )