रांगी येथे सार्वजनिक वाचनालय इमारतीचे उद्घाटन

58

रांगी येथे सार्वजनिक वाचनालय इमारतीचे उद्घाटन
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०९ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या रांगी येथील सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन सरपंच सौ. फालेश्वरी प्रदीप गेडाम यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले.
गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळावे, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना अभ्यासासाठी सोयीस्कर जागा उपलब्ध व्हावी यासाठी वाचनालयाची गरज होती. ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला आणि त्यानंतर वाचनालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
९ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमाला गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शशिकांत साळवे, उपसरपंच नुरज हलामी, ग्रामपंचायत सदस्य दिनेश चापडे, राँकेश कोराम, मकरंद बांबोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी सौ. अर्चना मेश्राम, सौ. विद्या कपाट, सौ. शशिकला मडावी, सौ. वच्छला हलामी, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भुरसे आणि गावातील नागरिकांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
वाचनालय इमारत सुरु झाल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासाची सुविधा मिळणार असून, स्पर्धा परीक्षा तयारीसाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here