The गडविश्व
गडचिरोली, दि.२१ : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी 95,957 कोटी रुपयांची तरतूद केली असली, तरी त्यापैकी 9,406 कोटी रुपये फक्त आयुष्यमान भारत योजनेसाठी वाटप करण्यात आले आहेत. मात्र, या योजनेत अनेक अनियमितता आणि घोटाळे उघडकीस आले असून, महालेखापालांच्या तपासणीत 300 कोटी रुपयांचा गैरव्यवहार आढळला आहे.
या पार्श्वभूमीवर, शासकीय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये योग्य आरोग्य सुविधा व प्रशिक्षित डॉक्टर्स उपलब्ध करण्यासाठी अधिक निधी द्यावा, अशी मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेत केली. आयुष्यमान भारत योजनेतील भ्रष्टाचार रोखण्याऐवजी, थेट सरकारी रुग्णालयांच्या विकासावर भर द्यावा, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
खासदार किरसान यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना प्रश्नोत्तराच्या तासात याबाबत विचारणा केली. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळण्यासाठी सरकार ठोस पावले उचलणार का? असा सवाल त्यांनी केला. आता केंद्र सरकार या मागणीला कसा प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(#thegdv #thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #ipl2025 #iplmatch #sonunigam )