– युवकांची ग्रामसेवक यांच्याकडे निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली, ३० ऑगस्ट : चातगाव येथे युवकांना वाचनालय उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी येथील युवकांनी ३० ऑगस्ट रोजी ग्रामसेवक यांच्याकडे निवेदनातून मागणी केली.
चातगाव ये गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर आहे. गावातील लोकसंख्या बऱ्यापैकी आहे. गावात अनेक युवक नोकरी साठी धडपडत आहेत. मात्र अभ्यासासाठी युवकांना वाचनालयाची आवश्यकता असल्याने काही युवकांनी ग्रामसेवक राठोड यांच्याकडे वाचनालय उपलब्ध करून द्यावे अशी निवेदनातून मागणी केली. यावेळी ग्रामसेवक राठोड यांनी निवेदनाची दखल घेत वाचनालय उपलब्ध करून देण्यास पुरेपूर सहकार्य केल्या जाईल असे आश्वासन दिले.
निवेदन देतांना राहूल बावणे ग्रामपंचायत सदस्य, कोमल कुमरे, रोशन जराते, अजिंक्य कुमरे तसेच ग्रामपंचायत चातगाव येथील युवक उपस्थित होते.