The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३० ऑगस्ट : येथील 113 बटालियन यांच्यातर्फे मेजर ध्यानसिंग यांचा जन्म दिवस राष्ट्रीय खेल दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या प्रित्यर्थ विविध खेळाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये व्हॉलीबॉल, फिट इंडिया रन, फिट इंडिया शपथ चे आयोजन करण्यात आले. या खेळात बटालियन चे अधिकारी तथा जवान यांनी भाग घेतला, खेळात भाग घेणाऱ्या जवानांना व विजेत्या खेळाळूना कमांडंट जसवीर सिंग यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. जवानांना संबोधित करताना राष्ट्रीय खेळ दिवसाचे महत्व पटवून दिले. आपल्या जीवनात खेळाचे अनन्या साधारण महत्व रोजच्या धकाधकीच्या रोज एक खेळ खेळायला पाहिजे असे मत याप्रसंगी व्यक्त केले.