लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मुरुमगाव परिसरातील समस्या कायम

229

– पत्रकार परिषदेतून आंदोलनकारी समितीचे आरोप, १५ डिसेंबर अल्टिमेट
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ४ डिसेंबर : तालुक्यातील मुरूमगाव परिसरातील जनतेनी प्रथम निवेदन देवुन चक्काजाम आंदोलन १९ ऑक्टोबर रोजी केले. आंदोलनकारी समितीने ८ तास चक्काजाम आंदोलन केले, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी आंदोलन स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र बैठक घेऊन मुरुमगाव येथील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. परंतु या घटनेला महिना उलटूनही ना बैठक बोलावली ना समस्या सोडविल्या. यांच्या नाकर्तेपणामुळेच समस्या जैसे तसेच आहेत असा आरोप करीत या भागाकडे कायम शासनाचे आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष होत असल्याने १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुरुमगाव परिसरातील समस्या मार्गी न लागल्यास १६ डिसेंबरला पुनश्च आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकारी समितीने ४ डिसेंबर २०२२ ला ग्रामपंचायत भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेतून दिला आहे.
पत्रकार परिषदेत म्हटले, धानोरा तालुक्यातील अतिदुर्ग क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुरूमगाव येथे आंदोलन समितीने ५ सप्टेंबर २०२२ ला मुरूमगाव परिसरातील मुरूमगाव येथे को-ऑपरेटिव बँकेची शाखा सुरू करावी, आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, मुरूमगाव येथील शासकीय आश्रम शाळेत ११, १२चे (विज्ञान) वर्ग सुरू करावे, मुरूमगाव येथे 4 जी सेवा सुरू करण्यात यावे, मुरूमगाव परिसरातील प्रशासकीय व इतर कर्मचारी बाहेरुण ये-जा करतात सर्व विभागाचे कर्मचारी स्थानिक ठिकाणी राहावेत, मालेवाडा ते मुरूमगाव – औंधी मार्गाचे खडगीकरण करुन डांबरीकरण व पुलाचे काम करावे, मुरुमगाव- तुंबडीकसा -हिरंगे ते कुलभट्टी पर्यंत रस्त्याचे खडीकरण करून डांबरीकरण करावे, बेलगाव ते पन्नेमारा मार्गाचे खडकी करून व डांबरीकरण करा, पन्नेमारा ते शिंदेसुर मार्गाचे खडर्गीकरण व डांबरीकरण करावे, रीडवाही ते उमरपाल, तुलाटोला पर्यंत रस्त्याचे खडगीकरण व डांबरीकरण करावे, हीरंगे ते गुरेकसा रस्ता निर्माण करावा, रेगांगाव ते गोटाटोलापर्यंत खडगिकरण व डांबरीकरण करावा, अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांचे वनपट्टे मिळण्याकरता जीपीएस मशीनद्वारे सर्वे करण्यात यावे, कुलभट्टी ते बोधनखेडा मार्गाचे डांबरीकरण करावे आशा एकूण १३ समस्या सोडविण्याबाबत निवेदन दिले. त्यानंतर १९ ऑक्टोबरला ८ तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनातील ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी आंदोलन स्थळी उपस्थित राहुन खासदार अशोक नेते यांचे प्रतिनिधी प्रकाश गेडाम, रवींद्र भांडेकर, तसेच जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी कुरखेडाचे तहसीलदार माळी, डी.वाय.एस. पी. जाधव यांच्या माध्यमातून तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेत मध्यस्थी करीत आंदोलन समितीची विशेष सभा १ नोव्हेंबर २०२२ ला मुरूमगाव येथे तर ३ नोव्हेंबर २०२२ ला गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळासह बैठक बोलावून समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले परंतु हे आश्वासन हवेत विरले. ठरलेल्या वेळी बैठक न घेता तिच बैठक मुरुमगाव येथे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र बैठकिला खासदार, आमदार आणि जिल्हास्तरावरचे अधिकारी उपस्थित न झाल्याने आमची बोळवन केल्याचे आंदोलकाचे म्हणणे आहे. त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज पर्यंत बैठक बोलावली नाही. प्रामुख्याने गावाला जोडणारे मार्ग नसल्याने येथील मागण्या कायमच आहेत.

देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करताना आमच्या समस्यांकडे बुद्धी पुरस्कृत दुर्लक्ष करण्यात येत आहे. एकही समस्या मार्गी न लागल्याचा आरोप ठेवत शासनाने वेळीच लक्ष देऊन समस्या १५ डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करावेत अन्यथा १६ डिसेंबर २०२२ पासून पुनश्च नाईलाजाने आम्ही आंदोलन करण्याचा इशारा शिवनाथ टेकाम, शिवप्रसाद गवर्णा सरपंच ग्रामपंचायत मुरूमगाव, अजमन रावटे माजी पंचायत समिती सभापती धानोरा, मुनीर शेख, हरीश धुर्वे सरपंच ग्रामपंचायत पन्नेमारा, वसंत कोलीयारा मा.पोलीस पाटील मुरूमगाव, मथनुराम मलिया ग्रामपंचायत उपसरपंच मुरूमगाव, अभिजीत मेश्राम, राजू कोठवार ग्रामपंचायत सदस्य मुरूम गाव, रामलाल मार्गीया खेडेगाव, जयलाल मार्गीया मा. पंचायत समिती सदस्य धानोरा, मुकेश मेश्राम बेलगाव, महेश कोठवार खेडेगाव, तिवारी भोयर ग्रामपंचायत सदस्य मुरूमगाव, कवळसिंग राणा ग्रामपंचायत सदस्य हीरंगे, निरंगशाहा मडावी, चावणशा मडावी, मुरूम गाव भूपेंद्र शाहू मडावी मुरूमगाव यांनी १६ डिसेंबर पासून समस्या मार्गी लागेपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून शासनाला दिलेला आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Dhanora) (Murumgon)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here