प्रीपेड मिटरने ओढावले मिटर रिडरवर बेरोजगारीचे संकट ; पर्यायी काम देण्याची मागणी

276

– अधिक्षक अभियंता, गडचिरोली म.रा.वि.वि.क. मर्या यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : केंद्रसरकार तसेच महाराष्ट्र राज्य सरकार आणि महावितरण कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर प्रिपेड मिटर ग्राहकांच्या घरी लागणार अशी निविदा काढण्यात आली आहे तसेच वर्तमान पत्राद्वारे जाहिर केली जात आहे. आतापर्यंत शासकीय कार्यालयात काही भागात प्रिपेड मिटर लागलेल आहेत. जर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रिपेड मिटर लागले तर मिटर रिडर बांधवांवर बेरोजगारीचे मोठे संकट उभे असल्याचे चित्र असून महाराष्ट्र राज्यात प्रिपेड मिटर लागल्यानंतर मिटर रिडरना पर्यायी कामाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी एम.एस.ई.डी.सी.एल. मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य च्या वतीने अधिक्षक अभियंता, गडचिरोली म.रा.वि.वि.क. मर्या यांना ४ जून रोजी निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मिटर रिडर कंत्राटदारा मार्फत महावितरण कंपनीमध्ये १५ ते २० वर्षापासुन कोणत्याही प्रकारची तक्रार न करता मिटर रिडरचे काम करित आहोत. केंद्रसरकार तसेच महाराष्ट्र राज्य सरकार आणि महावितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर प्रिपेड मिटर ग्राहकांच्या घरी लागणार अशी निविदा काढलेली आहे तसेच वर्तमान पत्राद्वारे जाहिर केली जात आहे आणि आतापर्यंत शासकीय कार्यालयात काही भागात प्रिपेड मिटर लागलेल आहेत. जर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रिपेड मिटर लागले तर मिटर रिडर बांधवानवर बेरोजगारीचे मोठे संकट अंगावर येण्याचे चित्र दिसत आहे. आम्ही कंत्राटदार आणि महावितरण कंपनी यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील नक्षलग्रस्त भागातील दुर्गम क्षेत्रात सुद्धा जीव धोक्यात घालून आणि कोरोना सारख्या महामारीतही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ह्या ऋतुमध्ये जिवाची पर्वा न करता महावितरण कंपनीत सुस्पष्ट मिटर रिडींग तसेच बिल वाटपाचे काम आतापर्यंत योग्य पद्धतीने कोणत्याही प्रकारची तक्रार न करता काम करित आहोत. तसेच आम्हाला बरेच मिटर रिडर बांधवांना कोणत्याही प्रकारचे पि.एफ. (P.F.) आणि ई. एस. आय. सी. (E.S.I.C.) अश्या कंत्राटदारा मार्फत मिळणाऱ्या सोयी-सुविधाचा लाभ न मिळता आम्ही तुटपुंज्या मानधनावर कोणत्याही प्रकारची तक्रार न करता शांतपने अन्याय सहन करून, आपण आणि कंत्रादाराने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही मिटर रिडर तसेच बिल वाटपचे काम तुमची कोणतीही तक्रार न येता योग्य पद्धतीने आजतागायत काम करीत आहोत.
परंतु जर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रिपेड मिटर लावले गेले तर महाराष्ट्रातील मिटर रिडींगचे काम करणारे तसेच १६ हजार मिटर रिडर यांची उपजीविका या व्यवसायावर असल्यामुळे १६ हजार मिटर रिडर तसेच बिल वाटप करणारे यांच्यावर बेरोजगारी उद्धवून महावितरण मध्ये मिटर रिडर हे पद कायम स्वरूपी बंद होईल. आणि महाराष्ट्रातील १६ हजार मिटर रिडर बेरोजगार होतीलच पण त्यांच्यावर अवलंबुन असणारे १६ हजार कुटूंब उध्वस्त होतील. आणि ८० हजार व्यक्तिवर उपासमारीची वेळ येईल. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्यसरकार तसेच महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रिपेड मिटर लावण्याच्या घेतलेल्या निर्णयाने १६ हजार मिटर रिडरचे काम गेल्यावर त्यांचे संपूर्ण जिवन उध्वस्त होऊन, त्यांच्यावर बेरोजगारीचे मोठे संकट येऊन बेरोजगारी पणामुळे आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे अशाप्रकारची आम्हा मिटर रिडर बांधवानवर परिस्थिती येऊ नये म्हणून प्रिपेड मिटर लागल्यानंतर महावितरण कंपनीमध्ये कोणत्यातरी पर्यायी कामाची संधी उपलब्धी करून द्यावी अशी मागणी निवेदनातून एम.एस.ई.डी.सी.एल. मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य च्या वतीने अधिक्षक अभियंता, गडचिरोली म.रा.वि.वि.क. मर्या यांना केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #Australia vs Oman #Papua New Guinea vs Uganda #Ireland vs India #Who won the election 2024 #Modi resignation #Devendra Fadnavis #JKBOSE 12th Result 2024 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here