पोलीस-नक्षल चकमक उडाली ; एक नक्षली ठार

2832

– घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात साहित्यही जप्त
The गडविश्व
बिजापूर, २३ जुलै : जिल्ह्याच्या भैरमगड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात २२ जुलै रोजी सकाळी ०७ ते ७.३० वाजताच्या सुमारास उडालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत एक नक्षली ठार करण्यात पोलीस दलास यश आले आहे. घटनास्थळ परिसरातून मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्यांसह इतर साहित्यहि जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल विरोधी मोहिमेअंतर्गत २१ जुलै रोजी DRG, बस्तर फायटर आणि CARIPU 222 कॉर्प्सचे संयुक्त पथक भैरमगढ एरिया कमिटीच्या १०-१५ सशस्त्र नक्षल्यांच्या उपस्थितीच्या गुप्त माहितीवरून रवाना करण्यात आले होते. दरम्यान २२ जुलै रोजी सकाळी ०७:०० ते ०७:३० वाजताच्या दरम्यान, केशामुंडीच्या जंगली पहाडमध्ये शोधमोहीम सुरु असताना, नक्षल्यांनी पोलीस दलावर अंदाधुंद गोळीबार केला यावेळी पोलीस दलाने स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिला असता नक्षली जंगल-डोंगराच्या आडून घटनास्थळावरून पळून गेले. सुमारे अर्धा तास ही चकमक चालली. चकमकीनंतर परिसरात शोध घेत असताना ०१ अनोळखी पुरुष नक्षलीचा मृतदेह सापडला, त्याच्या शरीरातून ०१ पिस्तूल, मॅगझीन, ०२ राऊंड जप्त करण्यात आले. तसेच घटनास्थळाची आजूबाजूला झडती घेतली असता नक्षली कॅम्पमधून कार्डेक्स वायर, जिलेटिन स्टिक, फ्यूज वायर, पिट्टू, नक्षली गणवेश, साहित्य आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच घटनास्थळ परिसरातील झाडाझुडपांत रक्ताच्या थारोळ्यात आणि ओढणीच्या खुणा आढळल्याने ३-४ माओवादी ठार व जखमी झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेत ठार झालेल्या नक्षलीच्या मृतदेहाची ओळख पटवणे आणि इतर कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यात येत आहे अशी माहिती आहे.

(the gdv, the gadvishva, Barcelona vs Juventus, Parents’ Day, Chelsea vs Brighton, Halal-certified tea, Charlie Chaplin,Arsenal vs Man United, Police-Naxal encounter broke out; A Naxalite killed, cg news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here