डाव्या पक्षांशिवाय जनतेला ठाम न्याय मिळणार नाही : भाई रामदास जराते

128

The गडविश्व
गडचिरोली, ७ जुलै : शिवसेनेतून बाहेर पडून भाजप सोबत अनैसर्गिक पध्दतीने बनविलेले सरकार जनतेला पचनी पडलेले नसतांनाच अचानकपणे सरकारमध्ये सामील होवून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जनमताची, राजकीय पायंड्यांची टिंगल केलेली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई उध्दवराव पाटील यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देवूनही त्यांनी ती अतिशय नम्रपणे नाकारुन राजकारणातील सुचिता पाळलेली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून राज्यात सत्ताधारी – विरोधक असे कोणतेही अंतर भाजप, काॅग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत राहिलेली नसून पद आणि पैशांच्या लोभाने राजकीय नितिमत्ता धुळीस मिळविली आहे.
त्यामुळे वैचारिक बैठक भक्कम असलेले डावे आणि प्रागतिक पक्षच ठाम विश्वास देवून जनहितार्थ नेतृत्व करण्यास सक्षम असून आता डावे पक्षच जनतेसाठी पर्याय आहेत. अशी प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी आजच्या राजकीय घडामोडींवर व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here