सत्य घटनेवर आधारित ‘पथम वालवू’ मल्याळम चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

298

The गडविश्व
मुंबई / मनोरंजन,दि.०७ : एका मागोमाग एक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक एम. पद्मकुमार यांच्या ‘पथम वालवू’ या सुपरहिट चित्रपटाचा १३ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. चित्रपटात मल्याळम चित्रपटसृष्टीतले कौशल्यवान अभिनेते इंद्रजित सुकुमारन आणि सूरज वेंजारामूडू यांनी कमालीचा अभिनय सादर केला आहे.
ड्युटी पूर्ण करून एस.आय सेथू आपल्या गर्भवती बायकोला दवाखान्यात बघायला जात असताना त्याला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून खून केलेल्या दोषीला पकडण्याची जबाबदारी येते. त्या खुनीचा मागोवा घेत सेथूला सोलोमन या व्यक्तीची माहिती मिळते. सोलोमनचा हृदय पिळवटून टाकणारा भूतकाळ ऐकून सेथूही भावनिक होतो. असा काय असेल भूतकाळ? हे चित्रपटात कळणार आहे.
“विविध भाषेतील विविध शैलीचे चित्रपट अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या माध्यमातून तमाम मराठी प्रेक्षकांना सादर करण्याचा आम्हाला नेहमीच अत्यानंद होतो. यासारखे अनेक बहुभाषी चित्रपट मराठीत रूपांतर करून जगाला जवळ करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. ‘पथम वालवू’ या सुपरहिट चित्रपटासोबतच झकास मनोरंजन, सदाबहार एकापेक्षा एक कौटुंबिक कथा, विनोदासह जबरदस्त ॲक्शन थ्रिलर चित्रपटांतील ड्रामा अनुभवण्यासाठी लगेच डाउनलोड करा ‘अल्ट्रा झकास ओटीटी’ ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.
नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here