The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा जारावंडी येथे गणराज्य दिनाचे औचित्य साधुन पालक मेळावा तथा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उदात्त हेतुने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मंचावर उद्घाटक म्हणुन सपनाताई कोडापे सरपंच जारावंडी, अध्यक्ष सुधाकर टेकाम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तर प्रमुख अतिथी म्हणून वासुदेवजी कोडापे, रमेश दुग्गा, प्राचार्य बी.एम.पंधरे, सुरेश मडावी, तोडासे मॅडम, यशवंत नरोटे, योगेश कुंमरे, श्रीराम कोलते, अशोक नरोटे, रजनीताई आतला, पंचफुला उसेंडी, मुकेश कावळे, दयाराम सिडाम, हरीश्चंद्र मडावी उपस्थित होते.
75 व्या गणराज्य दिनानिमित्त प्राचार्य बी. एस.पंधरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. ध्वजारोहनानंतर विद्यार्थ्यांनी लेझीम, डंबेल्सनृत्य, स्पोर्ट ड्रील व मार्शल कराटे चे चित्तथराक करतब करीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेचे पुजन माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. बी.एम.पंधरे यांनी आपल्या प्रास्ताविकेतुन भविष्यवेधी शिक्षण प्रणाली, उन्हाळी विशेष शिकवणी वर्ग, वर्षभरात शाळेत राबविलेले विशेष उपक्रम व विद्यार्थ्यांनी केलेली उल्लेखनिय कामगीरी याबाबत विस्तृत विवेचन करून पालक मेळाव्याचा उद्देश कथन केला.
यावेळी ए.एम.बारसागडे, पी.डब्लु.वानखेड, एच.बी.गेडाम, एम.के.गेडाम यांनी उन्हाळी विशेष शिकवणी वर्ग व 10वी आणि 12 वी नंतर शिक्षणाच्या संधी याबबात मार्गदर्शन केले. यावेळी रहनुमा पठाण व सलोनी कोडापे या विषयमित्रानी भविष्यवेधी शिक्षण व शाळेत राबविले जाणारे उपक्रम व त्याची परिणामकारकता याबाबत सादरीकरण केले.
पालक मेळाव्याचे औचित्य साधुन दहावी व 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना देखील गौरविण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लावणी, आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीत, नकला व एकांकीच्या माध्यमातून आपल्या कलागुणांची उधळण करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ए.एम.बारसागडे व भाग्यश्री काटेंगे यांनी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख अश्विनी भुईयार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश मादरबोईना, ए.एम.राणा, एन.बी.दुधे, एम.झेड.आतला, राज मुंजम, अतुल बोरूले, मोहुर्ले, सी.जी.वाघ, सरोजीत मंडल, निलेश उपराळे, समीर केरकटा, गावडे, सुजाता करमरकर, लक्ष्मण माने, मनिराम सेडमेक, सुभाष ठाकरे, दुर्गा कोडापे, पंकज रापुरे, शुभम मडावी व विद्यार्थांनी अथक परिश्रम घेतले.