शिव जयंती निमित्त न्यायाधिश विक्रम आव्हाळ यांच्यासह ६६ रक्तदात्यांनी केला रक्तदान

138

The गडविश्व
सडक अर्जुनी, दि. २७ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवजन्मोत्सव सोहळा समिती सडक अर्जुनी यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत रक्तदान शिबिर, मोफत दंत तपासणी शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, माजी सैनिकांचे सत्कार, महाप्रसाद तसेच शिव कीर्तनाचे आयोजन केले होते. रक्तदान शिबिरात नायाधिश विक्रम आव्हाळ यांच्यासह ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे वंदन करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली, यावेळी प्रामुख्याने न्यायाधीश विक्रम आव्हाळ तसेच दुग्गीपार पोलीस स्टेशन चे ठाणेदार मंगेश काळे, आरोग्य भारती तालुका सडक अर्जूनीचे अध्यक्ष डॉ. रोशन देशमुख यांची उपस्थिती होती.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन ठाणेदार मंगेश काळे यांनी लाल फित कापून केले. यावेळी न्यायाधीश विक्रम आव्हळ यांनी रक्तदान केले. सदर शिबिरात ६६ रकतदात्यांनी रक्तदान करून तालुक्याचा मान उंचाविला. कार्यक्रमाला नगराचे नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष श्रीमती वंदना डोंगरवार, सदस्य महेंद्र वंजारी, रजनी परीहार, सुगत चंद्रिकापुरे, दानेश साखरे, पत्रकार राजकुमार भगत, रेवराम मेश्राम, सुशील लाडे यांनी भेट दिली. डॉ. तुषार राहीले यांनी तालुक्यातील ७० रुग्णांची मोफत दंत तपासणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर कोरे तसेच माजी मुख्याध्यापक अनिल मेश्राम यांनी केले.
गावातील माजी सैनिक भगवान नंदागवळी, तुलाराम येरणे, लेखराम मुनेश्वर, चंद्रकुमार कठाणे, पद्माकर शेंडे, दिलीप काशिवार, शंकरकुमार हेमणे, मधुकर लांजेवार, सुनील कोहळे, दिलीप बोरकर, तसेच स्वर्गीय रविंद्र सूर्यवंशी यांची पत्नी भारती सूर्यवंशी, स्वर्गीय शंकर खोटेले यांची पत्नी कविता खोटेले आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यांचा सत्कार गावाच्या वतीने समिती च्या सदस्यांनी सन्मानपत्र व शिवाजी महाराज यांची फोटो देऊन करण्यात आले.
सायंकाळी सप्तखंजरी वादक युवराज मानकर यांचे जाहीर शिवकीर्तन ठेवण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक रोशन गहाणे, चितेस शेंडे, आकिब शेख, अनिकेत कापसे, अविरत पुरी, विक्रम पुरी, गणेश मालदे, कपिल हेडाऊ, उमेश उदापुरे आदी सदस्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here