राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या विस्तारासाठी ना. धर्मरावबाब आत्राम यांच्याकडून बोलेरो गाडी भेट

184

The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, दि.१६ : तालुक्यातील गावापातळीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विस्तार करणे, बूथ समिती स्थापन करणे यासाठी पार्टी पदाधिकारी यांना तालुक्याचा दौरा करणे सुलभ व्हावे यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांनी बोलेरो गाडी भेट दिली.
१५ नोव्हेंबर रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम आरमोरी येथे आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अमीन लालानी, तालुका कार्यकारी अध्यक्ष सुनील नंदनवार यांच्याकडे बोलेरो गाडीची चावी सुपूर्द केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेश संघटन सचिव मोहम्मद युनूस शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष लीलाधर भरडकर, आरमोरी शहर कार्यकारी अध्यक्ष प्रदीप हजारे, धुरंधर सातपुते, दीपक बैस, तालुका सरचिटणीस देवानंद बोरकर, अनिल अलबनकर, तालुका उपाध्यक्ष योगेश थोराक, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष दिवाकर गराडे, रवि दुमाने,अनुज घोसे, आशुतोष भरणे, तुषार हलामी, सुमित वाडीकर, प्रथमेश कोडापे, वैभव सेलोकर, अंकुल मानकर, अमित जुआरे, तेजस नवघरे, फाल्गुन म्हैसकर, पवण कुकडकार, कुणाल उपथडे, संघर्ष रामटेके, वैभव धदंरे, अमर मानकर, अमण दुमाने, सुमित ठाकरे, सुहास कुकडकर ,विनय देविकार, प्रमय वलथरे, यश नेऊलकर, अनुज निबेंकर, गितेश सोनकुसरे, लुकेश सपाटे, अमोल टेकाम, सचिन कुथे, वैभव टेकाम इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here