– दिवाकर भोयर यांची मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १६ : गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आधारभूत किमतीने खरेदी विक्री सोसायटी अंतर्गत धार खरेदी केले जाते. मात्र यावर्षी नोव्हेंबर महिना अर्धा संपला आणि शेतकऱ्यांच्या धानाची कापणी, मळणी होवुन दिवाळी सणाच्या तोंडावर धान खरेदी केंद्रा अभावी सण साजरा करण्यासाठी, शेतकरी स्वताच्या गरजा पूर्ण करण्याकरिता तसेच सावकारी कर्ज फेडण्यासाठी धान्य अतिशय कमी भावात व्यापाऱ्याला विकत आहे. शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान्याचा हमीभाव जाहीर करून आधार खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी दिवाकर भोयर यांच्यासह शेतकऱ्यांनी केले आहे.
प्रसिद्ध पत्रकार त्यांनी म्हटले आहे की गडचिरोली जिल्ह्यात पावसाळी म्हणजे खरिप हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पन्न घेतले जाते. मात्र यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिल्याने पूर्वी धान पक्ष्यांची दुबार पेरणी करावी लागली. निसर्गाच्या लहरी पणावर आधारलेली जिल्ह्यातील शेती शेवटच्या टप्प्यात किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट होताना दिसते. जड धानाला पाण्याचा फटका बसला, बळीराजांचे भातपीक करपले, तसेच जिल्ह्यात जंगली हत्तीने शेकडो शेतकऱ्याच्या हातात आलेले धानपिक तुडविले त्यामुळे शेतकऱ्यांनी भिती पोटी लवकर धान्य कापावे लागले. दिवाळी सणाच्या तोंडावर आपली गरज दूर करण्याकरता बळीराजांनी कापणी व मळणी सुरू केली पण घरी धान साठवणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. खरेदी केंद्र सुरू न झाल्याने धान विकायचे कुठे हा मोठा प्रश्न बळीराजापुढे निर्माण झालेला आहे. अशाच परिस्थितीत शेतकऱ्यांना स्वतःचे धान्य अतिशय कमी किमतीत व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. कोणताही परवाना नसलेले, गावागावात असलेले खाजगी व्यापारी बळीराजाचे धान्य अतिशय कमी पैसे देवून घेत आहेत. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होतांना दिसते. धान्याचे खरेदी करण्याकरिता खरेदी केंद्रावर सातबारा सप्टेंबर महिन्यापासून ऑनलाईन कामे सुरू असूनही दिवाळी संपली पण खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत.
सध्या तरी बळीराजावर संकट उभे टाकण्याची दिसून येते पाण्या अभावी धान करपले. उभे असलेले धान कडेने हस्त केले आणि हाती आलेले धान्य सरकार घेण्याच्या कोणतेही हालचाली करताना दिसत नाही. जगाचा पोशिंदा समजला जाणारा बळीराजाच भरडला जात आहे त्यामुळे सरकारने सकारात्मक पाऊल उचलून जिल्ह्यातील धान्याचे भाव जाहीर करून आधारभूत दान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी दिवाकर भोयर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.