कुरखेडा येथे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे भव्य स्वागत

293

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०६ : गडचिरोली -चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून नूकतेच नवनिर्वाचित झालेले महाविकास आघाडीचे खासदार डाॅ.नामदेव किरसान यांचे आज कुरखेडा शहरात प्रथमच आगमन झाले. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचा वतीने येथील बाजार चौकात त्यांचा फटाक्यांची भव्य आतिशबाजी तसेच शाल श्रीफळ व पुषपगुच्छ देत भव्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमूख सुरेंन्द्रसिंह चंदेल, काँग्रेस तालूका अध्यक्ष जिवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे, नगराध्यक्ष अनीताताई बोरकर, माजी नगराध्यक्ष डॉ. महेन्द्र कुमार मोहबंसी, शिवसेना उबाठा तालुका प्रमूख आशिष काळे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष गिरीधर तितराम, महिला काँग्रेस अध्यक्ष आशाताई तुलावी, नगरसेवक जयेंद्र चंदेल, जयश्री रासेकर, कांता मठ्ठे, जयश्री धाबेकर, माजी पं.स उपसभापति श्रीराम दूगा, आनंदराव जांभूळकर, आप पक्षाचे जिल्हा मिडीया प्रमूख नासीर हाशमी, तालुका संयोजक ईश्वर ठाकूर, माजी नगरसेवक पुंडलीक देशमुख, अल्पसंख्यक आघाडीचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष शोएब मस्तान, कपील पेंदाम, माजी नगरसेवक उसमान खान, आसिफ शेख, रोहित ढवळे, अशपाक खान, शारदा गाथाडे, राकेश चव्हाण नगरसेवीका हेमलता नंदेश्वर, तूकाराम मारगाये, भावेश मुंगणकर, भास्कर गूंडरे, माजी पं. स. सदस्य धरमदास उईके, माजी उपसरपंच दामोधर वट्टी, सूनिल कीलनाके, जावेद शेख,अयूब खान, मूजफ्कर बारी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थीत होते
यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सत्काराला उत्तर देताना सांगीतले क, जिल्हयाची मागासलेपणाची ओळख पूसत प्रगती पथावर आणण्याकरीता नियोजन बद्ध आराखडा तयार करणार तसेच सर्व सामान्याना विकासाचा केंद्र बिंदु मानत विकासाची प्रक्रिया गतिमान करणार असे आश्वासन दिले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda #mpdrnamdevkirsan)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here