नवनिर्वाचित आमदार डॉ.नरोटे यांनी धानोरा शहराला भेट देऊन जाणून घेतल्या समस्या

233

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २९ : नुकताच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून प्रथमच निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी धानोरा येथे पहिल्यांदाच भेट दिली. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला, त्यांची ही भेट अनौपचारिक भेट होती.
यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचा मोठ्या उत्साहामध्ये फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले. यावेळी धानोरा तालुका अध्यक्ष सौ. लता पुंघाटे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे, भाजपा युवा नेता सारंग साळवे, नगरसेवक संजय कुंडू, माजी नगरसेवक सुभाष घाईत, माजी महामंत्री महादेव गणोरकर, साजन गुंडावार, गजानन साळवे, अनंत साळवे, मानद सचिव कॉपरेटिव बँक गडचिरोली, प्रकाश कुर्जेकर, सौ.लीनाताई साळवे, माजी नगराध्यक्ष धानोरा, सौ. भुमाला परचाके, राकेश खरवडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या भेटीप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे प्रथम औक्षवंत करण्यात आले. या भेटीमध्ये आमदार नरोटे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भाजपा पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील धानोरा ते चिचोली या नदीवर पूल बांधण्यात यावा तसेच दूधमाळा ते मिचगाव या नदीवर सुद्धा पूल बांधून नागरिकांची जाणे येण्याची सोय करून प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लावावे अशी मागणी केली. तसेच आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भेट देऊन ग्रामीण रुग्णालयाची व रुग्णालयात असणारे रुग्णांची चौकशी करून विचारपूस करून आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.पंचायत समिती धानोरा येथे भेट देऊन पंचायत समितीचे बि. डी. ओ. सतीश चिटकुले यांच्याशी संवाद साधून त्यांनी मनरेगा घरकुल व इतर कामाबाबत चौकशी करून प्रत्येक गावातील प्रत्येकांना मजुरांना मनरेगा द्वारे काम देण्याच्या सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here